• Home
  • 🛑 हिरो मोटोकॉर्पचे २ खास स्कूटर झाले महाग, पाहा नवी किंमत 🛑

🛑 हिरो मोटोकॉर्पचे २ खास स्कूटर झाले महाग, पाहा नवी किंमत 🛑

🛑 हिरो मोटोकॉर्पचे २ खास स्कूटर झाले महाग, पाहा नवी किंमत 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 25 ऑगस्ट : ⭕ हिरो मोटोकॉर्पने आपले २ स्कूटर्सची किंमत वाढवली आहे. हे स्कूटर BS6 Pleasure Plus आणि Destini 125 स्कूटर्स आहेत. हिरो प्लेझर प्लसच्या बेस मॉडलच्या किंमतीत ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे याची किंमत आता ५६ हजार १०० रुपये झाली आहे. तसेच याच्या अलॉय व्हील्ज व्हेरियंटची किंमत आता ५८ हजार १०० रुपये झाली आहे. याआधी कंपनीने मे महिन्यात या स्कूटरच्या किंमतीत ८०० रुपयांची वाढ केली होती.

➡️ Hero Destini 125 स्कूटरच्या किंमतीत सुद्धा ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या स्कूटरच्या बेस मॉडलची किंमत आता ६५ हजार ८१० रुपये झाली आहे. तर अलॉय व्हील्ज मॉडलची किंमत आता ६८ हजार ६०० रुपये झाली आहे. ही किंमत दिल्ली एक्स शोरूमची आहे. या स्कूटरच्या किंमतीत कशामुळे वाढ झाली याचे कारण कंपनीने सांगितले नाही. Hero Pleasure Plus कंपनी चे एंट्री-लेवल स्कूटर आहे. तसेच याला बीएस६ अॅमिशन नॉर्म्स च्या प्रमाणे जानेवारीत अपडेट केले होते.

➡️ Hero Pleasure Plus स्कूटर ११० सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ८ बीएचपीचे पॉवर आणि ८.७ एनएमचे टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, बीएस६ इंजिनच्या Hero Pleasure Plus मध्ये स्कूटर एक्सलेरेशन सोबत १० टक्के अधिक फ्यूल इफिशियन्सी देते. या स्कूटरच्या दोन्ही इंड्समध्ये १० इंचाचे व्हील्ज देण्यात आले आहे. या स्कूटरमध्ये स्टोरेज पॉकेट्स अपफ्रंट सोबत मोबाइल चार्जिंग पोर्ट दिला आहे. तसेच साइड स्टँड इंडिकेटर आणि बूट लाइट यासारखे फीचर देण्यात आले आहे. अधिक सेफ्टीसाठी यात खास ब्रेकिंगसाठी स्कूटरमध्ये कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम दिले आहेत. ज्याला हिरो मोटोकॉर्पने इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम नाव दिले आहे. Hero Destini 125 स्कूटर मध्ये 125cc चे इंजिन दिले आहे. जे 9 bhp चे पॉवर आणि 10Nm चे पीक टॉर्क जनरेट करते.⭕

anews Banner

Leave A Comment