• Home
  • 🛑 अनलॉकवर सध्या ‘हेच’ औषध; मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट 🛑

🛑 अनलॉकवर सध्या ‘हेच’ औषध; मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट 🛑

 

🛑 अनलॉकवर सध्या ‘हेच’ औषध; मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

ठाणे, 25 ऑगस्ट : ⭕ ‘सुरक्षेचे नियम व मास्क वापरणे तसंच, हात धुवत राहणे, हेच अनलॉकवर औषध आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.’ अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिकेत करोना परिस्थितीचा आढावा घेण्यसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी करोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आले.

‘लॉकडाऊननंतर अनेक गोष्टींमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचाही प्रयत्न आहे. मात्र, गाफील राहू नका नका, सतर्क राहा. प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजन आणि नियमांचे पालन करा,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘अनलॉक करतामा सुरक्षिततेचे नियम व मास्क वापरणे तसेच हात धुवत राहणे हेच अनलॉकवर औषध आहे. तसंच, कंटेनमेंट झोन तसंच ट्रेसिंगवर अधिक भर द्यावा,’ अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. तसंच, ‘प्रत्येक वॉर्डात करोना दक्षता समिती स्थापन करावी व जनजागृती सातत्याने सुरु ठेवावी. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे.’ असंही ते म्हणाले.

‘पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष करू नका. गेले काही महिन्यांपासून आपण करोनावर लक्ष दिले आहे पण आता इतर बाबींवर लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे. त्यामुळं पावसाळी आजारांवर दुर्लक्ष करु नका.’ असंही ते म्हणाले आहे.⭕

anews Banner

Leave A Comment