Home उतर महाराष्ट्र सरकारी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन वितरक यांचा प्रस्न मांडणार – आमदार...

सरकारी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन वितरक यांचा प्रस्न मांडणार – आमदार यशोमती ठाकूर

95
0

आशाताई बच्छाव

IMG_20231203_193451.jpg

सरकारी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन वितरक यांचा प्रस्न मांडणार – आमदार यशोमती ठाकूर.          चांदवड,(सुनील गांगुर्डे प्रतिनिधी)

राज्यातील विधान सरकारच्या नाकर्तेपणामुळे विकास ठप्प झाला आहे.तर दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत देण्याचा विषय असो की. स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवाना धारक यांच्या समस्या प्रस्न असो याबाबत सरकारची नियत साफ नाही
सरकारला सरकारी स्वस्त धान्य वितरण व्यवस्था मोडीत काढायची आहे. पण आम्ही तुमच्या सोबत असून हा प्रस्न विधानसाभा गृहात मांडणार असल्याचं आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या. त्यांनी आज १ डिसेंबर रोजी आपल्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघाने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन स्थाळाला भेट देऊन चर्चा करताना आपला आंदोलनाला पाठिंबा असल्याचं त्या म्हणाल्या.
यावेळी आमदार बळवंत वनखडे सुद्धा उपस्थित होते. आमदार यशोमती ठाकूर सरकारवर टीका करताना म्हणाल्या की हे आवलक्षणी सरकार आहे. हे सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून विकासाला खीळ बसली आहे. खोटी आश्वासने, विकासाचा फक्त आभास, निधी वाटपात प्रचंड पक्षपात करणाऱ्या या सरकारच्या मनातच खोटं आहे. शेतकरी मरतोय मरू दे, व्यवसाय बुडतात बुडू दे, फक्त आपलं चागंभल झाल बस इतकंच या सरकारच धोरण असल्याची टीका करुन त्या म्हणाल्या की. सरकार भलेही शेतकऱ्यांच्या जीवावर उठले असेल, स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक यांच्या विषयी मनात खोटं असली तरी आम्ही मात्र तुमच्या पाठीशी आहोत.शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वचन बध्द आहोत. गरज पडली तर यासाठी रस्त्यावर उतरू अशी गवाही त्यांनी यावेळी दिली. तसेच हा प्रस्न देऊ घातलेल्या अधिवेशनात मांडणार असल्याचं आमदार यशोमती ठाकूर यांनी म्हणाल्या.

 

Previous articleपरीक्षा नियंत्रकानी दिली देगलूर महाविद्यालया भेट
Next articleतलावात बुडुन विद्यार्थ्यांचा मृत्यू. तुमसर तालुक्यातील डोंगराला येथिल घटना.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here