Home सोलापूर पाडव्याच्या सणादिवशी दुध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेचे खर्डा भाकरी आंदोलन..

पाडव्याच्या सणादिवशी दुध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेचे खर्डा भाकरी आंदोलन..

61
0

आशाताई बच्छाव

IMG_20231115_064331.jpg

पाडव्याच्या सणादिवशी दुध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेचे खर्डा भाकरी आंदोलन..

 

सोलापूर
टेंभूर्णी
सध्या महाराष्ट्रातील दुध ऊत्पादक शेतकरी दुधाचे दर कमी झाल्यामुळे संकटात सापडला आहे.याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने पाडवा सणादिवशी खर्डा भाकरी खाऊन रयत क्रांतीचे राज्य कार्याध्यक्ष दिपक भोसले व जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.सुहास पाटील यांनी आंदोलन केले.१६ जुलै २०२३ पासुन सरकारने ३.५ डिग्री व ८.५ एस.एन.एफ या गुणप्रत दुधाला ३४ रूपये प्रति लिटर हमीभाव ठरवून शासन निर्णय जाहीर केला.त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे खाजगी दुध संघ व सहकारी दुध संघानीं करावी असे जाहीर केले.काही महिने वरील गुणप्रतिला ३४ रूपये दरही शेतकर्‍यांना मिळाला.परंतु खाजगी दुध संघाची मक्तेदारी वाढल्यामुळे ३४ रूपये प्रतिलाटर दुध दर बंधनकारक असतानाही सध्या दुधाचे दर २६ ते २८ रूपयांपर्यंत खाली आले.पशु खाद्याचे दर भरमसाठ वाढलेले आहेत.कमी पर्जन्यमानामुळे वैरणीचाही तुटवडा भासत आहे.अनेक समस्यांनी दुध शेतकरी अडचणीत आला आहे.त्यामुळे शासन निर्णयाची अंमलबजावणी काटेकोर करावी. याची दखल सरकारने गांभिर्याने घ्यावे.कमी दर देणार्‍या दुध संघावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने खर्डा भाकरी आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात “पाडवा सरकारचा,शिमगा दुध ऊत्पादक शेतकर्‍यांचा” अशा घोषणाही देण्यात आल्या.यावेळी रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिपक भोसले,जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.सुहास पाटील,रयत क्रांती संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सुनिल पाटील,भाजपाचे सुरेश काका पाटील,विक्रम वाडेकर,विशाल घाडगे,ऊजनीचे माजी ऊपसरपंच किशोर शिरतोडे,पप्पु कवडे,माऊली काका पाठक,बापू कवडे,मच्छिंद्र घाडगे आदीजन ऊपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here