Home सातारा लडाखमध्ये लष्कराचे वाहन नदीत कोसळून अपघात, साताऱ्यातील खटावचे सुभेदार विजय शिंदे यांना...

लडाखमध्ये लष्कराचे वाहन नदीत कोसळून अपघात, साताऱ्यातील खटावचे सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण

104
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220528-WA0010.jpg

लडाखमध्ये लष्कराचे वाहन नदीत कोसळून अपघात, साताऱ्यातील खटावचे सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण

युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चीफ biro mahadev Gholap.

वाई : लडाख येथे लष्कराचे वाहन नदीत कोसळून झालेल्या अपघातात साताऱ्यातील खटावचे सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण आले. २६ सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला. त्यामध्ये साताऱ्यातील विसापूर (ता. खटाव) येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचा समावेश आहे. देशसेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले. या घटनेमुळे विसापूरसह खटाव तालुका शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.
विजय सर्जेराव शिंदे हे सन १९९८ मध्ये २२ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये लष्करी सेवेत रुजू झाले होते. २४ वर्षाच्या कालावधीत त्यांनी लष्करात विविध ठिकाणी काम करून देशाचे संरक्षण केले. विसापूर गावाला सैनिकी परंपरा आहे. विजय शिंदे यांचे वडील सर्जेराव शिंदे लष्करात होते, तर मोठे बंधू प्रमोद शिंदे हे लष्करात पॅरा कमांडो म्हणून कार्यरत आहेत.सध्या विजय शिंदे यांचे पोस्टिंग लेह लडाख येथे होते. लष्करात ते सुभेदार या पदावर कार्यरत होते. २६ जवानांचे परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उपसेक्टर हनिफच्या फॉरवर्डकडे जात असताना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले. या अपघातात सात सैनिकांचा मृत्यू झाला आणि १६ जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्याच अपघातात सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण आले.

Previous articleनेहरूंच्याच धोरणाने देशाचा सर्वांगीण विकास— महेंद्र ब्राम्हणवाडे
Next articleसावरमाळ ‘येथील खून प्रकरणी आरोपी अटकेत. “मुक्रमाबाद पोलीसांची पून्हा उल्लेखनीय कामगिरी’
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here