Home नांदेड सावरमाळ ‘येथील खून प्रकरणी आरोपी अटकेत. “मुक्रमाबाद पोलीसांची पून्हा उल्लेखनीय कामगिरी’

सावरमाळ ‘येथील खून प्रकरणी आरोपी अटकेत. “मुक्रमाबाद पोलीसांची पून्हा उल्लेखनीय कामगिरी’

181
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220528-WA0011.jpg

सावरमाळ ‘येथील खून प्रकरणी आरोपी अटकेत.
“मुक्रमाबाद पोलीसांची पून्हा उल्लेखनीय कामगिरी’
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील प्रेमला ऊर्फ इंदरबाई हिचा खूनच झाल्याची घटना पोलिसांच्या तपासात उघडकीस आली . देगलूरला जाते म्हणून ती बेटमोगराहून निघाली . मात्र तिचे प्रेत सावरमाळ परिसरात ठेचून मारल्याच्या अवस्थेत सापडले . त्यामुळे पोलीसही अचंबित झाले होते . प्रभारी स.पो.नि.संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. गजानन कागणे यांनी कौशल्य पणाला लावून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवले. प्रेमला हिचा खून नेमका कोणी केला आणि कशासाठी केला ? याचा तपास लावणे पोलिसांसमोर आव्हान बनले होते प्रेमलाबाई ही मूळची बेटमोगरा येथील . तिचे वय ३० वर्षे तिचा विवाह भेंडेगाव ता . मुखेड येथील युवकाशी झाला होता . २०१८ मध्ये तिच्या पतीचे निधन झाले . तेव्हापासून ती बेटमोगरा येथे वयस्कर आई व बहिणीसोबत राहत होती .११ मे रोजी सकाळी देगलूरला जाऊन येते म्हणून ती बेटमोगरा येथील घरातून बाहेर पडली . ती परतलीच नाही . १५ मे रोजी सावरमाळ सावळी शिवारामधील सर्व्हे नंबर ५४ मध्ये खाजासाब पिंजारी यांच्या आखाड्यावर प्रेमलाबाईचे प्रेत रक्तबंबाळ अवस्थेत सापडले . घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी भेट देऊन
पंचनामा केला ,शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन मुक्रमाबाद पोलिसांना तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या . त्यावरून मुक्रमाबादचे ठाणे प्रभारी स.पो.नि. संग्राम जाधव पो.उप.नि.गोपीनाथ वाघमारे यांच्या सह तपासणी अधिकारी गजानन कागणे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शंकर खपाटे वय ३६ वर्षे,श्रीराम पिटलेवाड वय३१ वर्षे रा.बेटमोगरा ता.मूखेड यांना ताब्यात घेउन अधिक तपासात आरोपींनी गून्हा कबूल केला.अनैतिक संबंध व आर्थिक देवाण घेवाण मध्ये वाद निर्माण झाले असल्याने बेटमोगरा येथून सावरमाळ येथे आनून दगडाने डोक्यात मारून खून केल्याचे सांगितले.
गून्हा नोंदणी नंतर केवळ तिनच दिवसात मूक्रमाबाद पोलिसांनी पून्हा चमकदार कामगिरी करीत गून्ह्याचा छडा लावण्यात यश मिळवले,
पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मूक्रमाबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी स.पो.नि. संग्राम जाधव,पो.उ.नि.गोपीनाथ वाघमारे यांच्या सह तपासणी अधिकारी पो.उप.नि.गजानन कागणे यांनी चमकदार कामगिरी केली.
त्यांना तपासणी कामात पो.हे.काँ.९३५ पठाण,पो.हे.काँ.२००० सूरनर, पो.ना.मिरगेवाड,पो.काँ.तग्याळकर (रायटर),पो.काँ.पांचाळ, चालक ऐ.ऐस.आय.गायकवाड, पो.काँ.पठाण यांनी मदत केली.
मूक्रमाबाद पोलीसांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल वरीष्ठ अधिकारी यांनी अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. सर्व नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here