Home गडचिरोली वैनगंगा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यु… आमदार डॉ. देवरावजी होळी...

वैनगंगा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यु… आमदार डॉ. देवरावजी होळी यांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले

102
0

आशाताई बच्छाव

IMG_20231115_064814.jpg

वैनगंगा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यु…
आमदार डॉ. देवरावजी होळी यांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले

प्रशासनाने बोटिंगच्या माध्यमातून शोधमोहीम प्रभाविपणे राबवा असे निर्देश दिले…

चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रैतवारी येथील करण गव्हारे आपल्या मित्रासोबत पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नदीपात्रात मृतदेह अडकल्याने कालपासून शोधमोहीम सुरु आहे……..
प्रेत बेपत्ता असल्यामुळे पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनात शोधमोहीम सुरू….
मित्रांसोबत वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या कुनघाडा (रै )येथील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी ११.३० ते १२ वाजताच्या दरम्यान घडली. करण गजानन गव्हारे वय अंदाजे २५ वर्ष रा कुनघाडा रै असे मृत युवकाचे नाव आहे.
नाव व बोटीच्या माध्यमातून शोधमोहीम चालवुनही प्रेताचा पत्ता अजून पर्यंत लागला नसून, पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील शोधमोहीम सुरू असल्याची माहिती मिळताच आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन हि मोहीम प्रभावीपणे राबवावी असे प्रशासनाला निर्देश दिले.
घटनास्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १० ते १२ वर्गमित्र एकत्र जमून कुनघाडा रै ते डोनाळा वैनगंगा नदीघाटावर आंघोळीसाठी गेले होते त्यापैकी तीन युवक नदीपात्रात उपलब्ध असलेल्या नावेवर बसून नाव चालविण्यात मग्न होते. नाव पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जाऊन डुबण्याच्या स्थितीत असतांना तिन्ही युवक पाण्याच्या खाली उडी मारून कसेबसे बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते. तेव्हा मृत करण गव्हारे हा खोल पाण्याच्या बाहेर होता. मात्र एक मित्र बुडत असल्याचे समजताच मृत करणने पाण्यात उडी मारून पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने गेला मात्र त्याला पाण्याचा अंदाज घेता आला नाही. पाण्याचा प्रचंड प्रवाह सुरू असल्यामुळे त्याला पाण्याच्या बाहेर पडता आले नाही .व तो पाण्यातच बुडून राहिला. प्रेताचा शोध घेण्यासाठी प्रथम नाव सोडण्यात आले मात्र प्रयत्न असफल ठरले नंतर बोटच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू करण्यात आली काल दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शोधमोहीम चालली मात्र अद्यापही प्रेताचा पत्ता लागलेला नाही. पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन समिती चमू यांच्या अथक परिश्रमात शोधमोहीम सुरू आहे. यावेळी घटनास्थळी आमदार डॉ. देवरावजी होळी, पोलीस पाटील दिलीप श्रुंगारपवार, तलाठी नितीन मेश्राम, कोतवाल नेताजी वाघाडे व मृतकाचे नातेवाईक हजर होते.

Previous articleपाडव्याच्या सणादिवशी दुध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेचे खर्डा भाकरी आंदोलन..
Next articleमंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी स्व.अरविंद खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची घेतले भेट!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here