Home महाराष्ट्र काळू धरण लवकरच भागवणार ठाणेकरांची तहान ! काळू धरणाचा मार्ग मोकळा…

काळू धरण लवकरच भागवणार ठाणेकरांची तहान ! काळू धरणाचा मार्ग मोकळा…

78
0

राजेंद्र पाटील राऊत

काळू धरण लवकरच भागवणार ठाणेकरांची तहान ! काळू धरणाचा मार्ग मोकळा…

ठाणे (अंकुश पवार,सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनेल)

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात रखडलेल्या पाणीयोजनांना गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कृती दलाची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सिंचन भवनात जिल्ह्यातील पाणीयोजनांचा आढावा घेतलासिंचन भवनात झालेल्या बैठकीत जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड.रखडलेल्या प्रकल्पांसाठी कृती दल स्थापन करण्याची जलसंपदामंत्र्यांची घोषणा
लोकसंख्या आणि पाण्याचा पुरवठा यात तफावत असल्याने जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी पाणीटंचाईसदृश परिस्थिती असल्याचे या वेळी शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही पाणीपुरवठ्यातील त्रुटींमुळे सातत्याने टंचाई निर्माण होत असून ही मानवनिर्मित टंचाई असल्याचा आरोप केला. त्यामुळे जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी हालचाली करण्याच्या सूचना या वेळी जयंत पाटील यांनी दिल्या.

जिल्ह्यातील पाण्याची तहान भागवण्यासाठी काळू आणि शाई यांसारखे प्रकल्प पूर्ण करणे गरजेचे आहे. यात काळू धरणाच्या उभारणीची प्रक्रिया पूर्ण होत असून ती प्राधान्यान पूर्ण केली जाईल. त्यासाठी एमएमआरडीएची मदत घेतली जात असल्याचे या वेळी जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात अनेक पाणी योजना विविध कारणांनी रखडल्या आहेत. त्यांना मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कृती दलाची स्थापन करण्याचे त्यांनी या वेळी घोषित केले.
ठाणे जिल्ह्यातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्या तुलनेत पुरवले जाणारे पाणी यात तफावत असल्याने टंचाई निर्माण झाली असून येत्या काळात पाण्याची गरज भागवण्यासाठी काळू धरणाची उभारणी प्राधान्याने केली जाणार असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ठाण्यात स्पष्ट केले. सिंचन भवन येथे पार पडलेल्या बैठकीनंतर ते बोलत होत.

बारवी धरणाच्या विस्तारीकरणानंतर ठाणे महापालिकेला १०० दशलक्ष लिटर पाणी दिले जाणार होते. मात्र वाटपाच्या सुधारित यादीत ठाणे महापालिकेचे नावच नसल्याचे महापालिका आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनी या वेळी सांगितले. महापालिका बारवी धरणग्रस्तांना नोकरी देण्यासाठी तयार असून यावर तोडगा काढण्याची मागणी या वेळी शर्मा यांनी केली.

Previous articleकोकणात आलिशान क्रुझ सफारीसह होणार पर्यटन; भास्कर जाधवांची माहिती
Next articleशालेय बससेवा बंदच : पूर्ण क्षमतेने विद्यार्थी वाहतुकीला परवानगी ,४० टक्क्यांनी भाडय़ाच्या दरात वाढ करण्याची मागणी….! शालेय बससेवा मालक हवालदिल…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here