Home कोकण कोकणात आलिशान क्रुझ सफारीसह होणार पर्यटन; भास्कर जाधवांची माहिती

कोकणात आलिशान क्रुझ सफारीसह होणार पर्यटन; भास्कर जाधवांची माहिती

83
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 कोकणात आलिशान क्रुझ सफारीसह होणार पर्यटन; भास्कर जाधवांची माहिती 🛑
रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

गुहागर :⭕ मुंबई ते गोवा या सागरी मार्गावरील आलिशान प्रवास सुरू झाला असून याचा फायदा गुहागरलाही मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई ते गोवा या प्रवासात या आलिशान क्रुझला गुहागर तालुक्यातील वेलदूर येथे थांबा मिळाला असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जेटीचे काम वेलदूर येथे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शृंगारतळी येथे दिली.

कोकण किनारपट्टीवरील सागरी निसर्ग सौंदर्यांचा आस्वाद घेत, या आलिशान क्रुझमधून सर्व सुखसोयींनीयुक्त अशी ही सफर प्रवाशांसाठी उपलब्ध झाली आहे. मात्र, मुंबई ते थेट गोवा अशी सोय असल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीवर या क्रुझला थांबा नव्हता. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी संबंधितांशी चर्चा करून वेलदूर येथे या क्रुझला थांबा मंजूर करून घेतला आहे. त्यासाठी वेलदूर येथे जेटी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे माहितीही आमदार जाधव यांनी दिली.

क्रुझच्या या वेलदूर येथील थांब्यामुळे गुहागरच्या पर्यटन व्यवसायावर चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा प्रवासावर या आलिशान क्रुझला वेलदूर येथे थांबा मिळाल्यास गुहागरच्या पर्यटन व्यवसायामध्ये मोठी वाढ होण्याची आशा येथील पर्यटनप्रेमींनी केली आहे.

गुहागरातील किनाऱ्‍यावर प्रसिद्ध देवस्थाने गुहागर तालुक्यातील काही समुद्र किनाऱ्‍यावर प्रसिद्ध देवस्थाने असून, या देवस्थानांनाही पर्यटकांना भेट देता येईल. गुहागरच्या पर्यटन क्षेत्रामध्ये चांगली वाढ व्हावी व येथील तरुणांना व व्यावसायिकांना रोजगार मिळावा यासाठी आमदार जाधव पूर्वीपासूनच आग्रही आहेत.⭕

Previous articleगलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून धरली शेतीची कास 🛑
Next articleकाळू धरण लवकरच भागवणार ठाणेकरांची तहान ! काळू धरणाचा मार्ग मोकळा…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here