Home मुंबई शालेय बससेवा बंदच : पूर्ण क्षमतेने विद्यार्थी वाहतुकीला परवानगी ,४० टक्क्यांनी भाडय़ाच्या...

शालेय बससेवा बंदच : पूर्ण क्षमतेने विद्यार्थी वाहतुकीला परवानगी ,४० टक्क्यांनी भाडय़ाच्या दरात वाढ करण्याची मागणी….! शालेय बससेवा मालक हवालदिल…

215
0

राजेंद्र पाटील राऊत

शालेय बससेवा बंदच : पूर्ण क्षमतेने विद्यार्थी वाहतुकीला परवानगी ,४० टक्क्यांनी भाडय़ाच्या दरात वाढ करण्याची मागणी….! शालेय बससेवा मालक हवालदिल…

ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनेल)

ठाणे, पुणे, ठाणे जिल्हा बस मालक संघटना,एम.जे टूर्स अँड ट्रॅव्हल्स, इंडियन ट्रॅव्हल्स, स्कूल व्हेन-बस, छोटे गाडी मालक चालक – मालक संघटना यांची मागणी दरवाढीची बस संघटनांकडून मागणी करोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा १५ दिवसांपूर्वी पुन्हा सुरू झाल्या आहेत.
करोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने शाळा पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना करोनाची लागण होऊ नये म्हणून शासनाने नियमावली आखून दिली आहे. शालेय बसमध्ये केवळ ५० टक्केच विद्यार्थ्यांना नेता येणार आहे. इंधनाचे वाढलेले भाव आणि त्या तुलनेत कमी प्रवासी वाहतुकीचे निर्बंध असल्याने शालेय बस संघटनांनी दरवाढीची मागणी केली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालक काही छोटय़ा आणि खाजगी गाडय़ांच्या पर्याय स्वीकारतात. हे छोटे गाडी मालक त्यांच्या गाडीच्या क्षमतेनुसार १० ते १५ विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. या वाहनांच्या मालकांनी त्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ केली आहे. एकीकडे बस बंद आणि दुसरीकडे लहान वाहनांनी केलेली दरवाढ यांमुळे पालकवर्ग कोंडीत सापडला आहे.

पूर्ण क्षमतेने विद्यार्थी वाहतुकीला परवानगी देण्यात यावी, अन्यथा ४० टक्क्यांनी दरवाढीची मागणी जिल्हा बसमालक संघटनेतर्फे करण्यात येत आहे. या मागण्या पूर्ण होईपर्यंत काही बसचालकांनी प्रवासी सेवा देण्यात येणार नाही, असा निर्णय घेतला आहे, तर काहींनी छुप्या पद्धतीने बस दरवाढ लागू केल्याने पालकांवर अतिरिक्त बोजा पडू लागला आहे.

करोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा १५ दिवसांपूर्वी पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र शासनाने त्यासाठी नियमावली तयार केली आहे. जे विद्यार्थी शाळेत बसने जाणार आहेत, ते एका आसनावर एकच विद्यार्थी अशा पद्धतीने प्रवास करतील. यासंबंधी पालकांनी आणि वाहनचालकांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसमध्ये केवळ ५० टक्के क्षमतेनेच वाहतूक करावी लागणार आहे. शाळा सुरू झाल्याने अर्थचक्र रुळावर येईल, अशी आशा सर्व बसमालकांना होती. संपूर्ण क्षमतेने विद्यार्थी वाहतुकीला परवानगी मिळाली नसल्याने बसमालकांचा हिरमोड झाला आहे. बस सुरू केल्या तर विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी अधिकच्या फेऱ्या माराव्या लागणार आहेत. त्यात मागील काही महिन्यांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. अधिकच्या फेऱ्या आणि इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ वाढ यांमुळे सध्या शालेय बस चालविणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्याचे बसमालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने विद्यार्थी वाहतुकीला परवानगी आणि ४० टक्क्यांनी दरवाढ होत नाही तोपर्यंत शालेय बस चालविणार नसल्याचा पवित्रा या संघटनांनी घेतला आहे.

Previous articleकाळू धरण लवकरच भागवणार ठाणेकरांची तहान ! काळू धरणाचा मार्ग मोकळा…
Next articleपिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले 100 कोटी रक्कम ; नोटा मोजायला 80 अधिकाऱ्यांना लागले तब्बल 18 तास
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here