Home माझं गाव माझं गा-हाणं पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले 100 कोटी रक्कम ; नोटा मोजायला 80 अधिकाऱ्यांना...

पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले 100 कोटी रक्कम ; नोटा मोजायला 80 अधिकाऱ्यांना लागले तब्बल 18 तास

970
0

राजेंद्र पाटील राऊत

पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले 100 कोटी रक्कम ; नोटा मोजायला 80 अधिकाऱ्यांना लागले तब्बल 18 तास
निफाड-(नाशिक)- सागर कटाळे युवा मराठा न्युज निफाड तालुका प्रतिनिधी पिंपळगाव बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाला 26 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि सुमारे 100 कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे समजते.आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पिंपळगाव बसवंत ची ओळख आहे .त्यामुळे येथील व्यापारी कोट्यवधींची उलाढाल करतात. याच संधीचा फायदा घेत आयकर विभागाने पिंपळगाव बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांकडे 26 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि सुमारे 100 कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे समजते.केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी गुरुवारी छापे टाकण्यात आले होते. सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या व्यापाऱ्यांचे कार्यालय आणि बँक खात्यांची तपासणी केली. आयकर विभागाने रोख रक्कमही जप्त केली. हा पैसा मोजण्यासाठी तब्बल ८० अधिकारी होते. त्यांनी नाशिक, पिंपळगावमधील बँकामध्ये जवळपास अठरा तास रोकड मोजली. दरम्यान, या कारवाईमुळे राज्यभरातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अनेक व्यापारी आणि राजकीय नेत्यांंनीही या कारवाईवर आक्षेप घेत कारवाईसाठी निवडलेली वेळ चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here