Home नाशिक नांदगाव महाविद्यालयात महाविद्यालयीन स्तरावर अविष्कार स्पर्धा संपन्न

नांदगाव महाविद्यालयात महाविद्यालयीन स्तरावर अविष्कार स्पर्धा संपन्न

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20220916-WA0035.jpg

नांदगाव महाविद्यालयात महाविद्यालयीन स्तरावर अविष्कार स्पर्धा संपन्न…                            . नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे.
येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेसाठी परीक्षक आणि प्रमुख व्याख्याते म्हणून मालेगाव येथील म.स.गा. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एफ शिरुडे हे उपस्थित होते. यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना संशोधन तसेच नाविन्यपूर्ण संकल्पना जोपासाव्या तसेच निरीक्षण करण्यावर भर द्यावा, असे सांगितले. यावेळी अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एन शिंदे हे उपस्थित होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन नवीन संकल्पना राबवून व्यावसाय कसे करावे तसेच विज्ञानातील विविध संशोधन क्षेत्रांची माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय मराठे, आय क्यू ए सी समन्वयक डॉ. विठ्ठल सोनवणे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. भागवत चवरे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ मंगेश दुशिंग हे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. संजय मराठे, डॉ. भागवत चवरे आणि ए बी जाधव यांनी परीक्षण केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील संशोधन विभागाचे समन्वयक डॉ. अनिल तिदार यांनी केले. त्यांनी अविष्कार स्पर्धेचे नियमावली महत्त्व तसेच उद्दिष्टे उपस्थिताना विषद केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी सहभागी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. भागवत चवरे यांनी आभार प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here