Home अमरावती खेड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन !

खेड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन !

23
0

आशाताई बच्छाव

IMG_20240210_214255.jpg

खेड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन !

३० बेडचे सुसज्य ग्रामीण रुग्णालय होणार निर्माण !

आमदार देवेंद्र भुयार यांनी केली रुग्णालय बांधकामाच्या जागेची पाहणी !
गजानन जिरापुरे
जिल्हा प्रतिनिधी
मोर्शी तालुक्यात बऱ्याच काळापासून खेडवासियांची प्रमुख मागणी असलेले खेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात व्हावे ही मागणी आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे निकाली निघाली असून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार खेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेनिवर्धन करून मान्यता मिळाल्याने आ देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना फार मोठे यश आले आहे. त्यामुळे खेड आरोग्य केंद्रातील गावांमधील ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार होण्यास मदत होणार आहे.
खेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ग्रामीण भागातील खेड, उतखेड, कोळविहीर, वरला, लाडकी, खोपडा, आष्टगाव, अंबाडा, पिपरी, दहसुर, गणेशपूर, सायवाडा, रायपूर, डोमक, तरोडा, आस्टोली, रिद्धपुर, ब्राम्हणवाडा, दाभेरी, बऱ्हाणपूर, विष्णोरा ही गावे येत असल्याने ते गैरसोयीचे होते. ही बाब आमदार देवेंद्र भुयार यांच्या लक्षात आल्यानंतर आ. देवेंद्र भुयार यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
खेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेनिवर्धन करण्यास मान्यता देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आ. देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे यशस्वी पाठपुरावा करून केल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची राज्य शासनाकडून गंभीरपणे दखल घेण्यात आली असून आरोग्य विभागाकडून आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीचा विचार करत करत कार्यवाही करण्यात आली असून आरोग्य विभागने काढलेल्या परिपत्रकात खेड येथे ग्रामीण रुग्णालयास मंजुरी देण्यात आली आहे.
मोर्शी तालुक्यातील खेड गाव जवळपास १० हजार लोकसंख्येचे गाव असून इतर आसपासची २० गावे खेड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गात येतात. भौगोलिक दृष्ट्या खेड प्राथमिक आरोग्य केंद्र हे हजारो नागरिकांना सेवा पुरविण्यासाठी अपुरे पडत असल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता त्यामुळे नागरिकांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. आमदर देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे आता संबंधित गावांमधील लोकांचा हा त्रास वाचला असून आरोग्य सुविधा गरजू लोकांपर्यंत जलद गतीने पोहचण्यास देखील मोठी मदत होणार असल्याचे यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
मोर्शी तालुक्यातील ग्राम खेड येथे राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून ३० खाटांचे ग्रामीण रूग्णालय मंजुर करून आणले असून आमदार देवेंद्र भुयार यांनी संबंधित अधिकारी यांच्यासह रूग्णालय बांधकाम करण्या बाबत जागेची पाहणी करून तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
खेड, उतखेड, कोळविहीर, वरला, लाडकी, खोपडा, आष्टगाव, अंबाडा, पिपरी, दहसुर, गणेशपूर, सायवाडा, रायपूर, डोमक, तरोडा, आष्टोली, रिद्धपुर, ब्राम्हणवाडा, दाभेरी, बऱ्हाणपूर, विष्णोरा या सर्व गावातील नागरिकांच्या आरोग्य सेवे साठी स्वतंत्र ३० बेड ग्रामीण रुग्णालय हे विशेष बाब म्हणून आमदार देवेंद्र भुयार यांनी मंजूर करून आणल्याबद्दल संपूर्ण गावातील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.

Previous articleजागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर इंग्रजी भाषा आलीच पाहिजे– शंकर कुद्रे सर.
Next articleप्रा.प्रणित देशमुख यांना सैनिक फेडरेशन चा पुरस्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here