Home नांदेड जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर इंग्रजी भाषा आलीच पाहिजे– शंकर कुद्रे सर.

जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर इंग्रजी भाषा आलीच पाहिजे– शंकर कुद्रे सर.

23
0

आशाताई बच्छाव

IMG_20240210_200216.jpg

जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर इंग्रजी भाषा आलीच पाहिजे– शंकर कुद्रे सर.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

वलांडी : विद्यार्थ्यांनो उद्याच्या जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर इंग्रजी भाषा आलीच पाहिजे, असे उदगार साहित्यिक समीक्षक, इंग्रजीचे गाढे अभ्यासक, तज्ञमार्गदर्शक तथा युट्युब फेम शंकर कुद्रे यांनी काढले आहेत. ते कै. विमलताई माध्यमिक विद्यालय दवनहिप्परगा ता.देवणी जि. लातूर येथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे संस्थापक तथा कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक सन्माननीय धनराज छिद्रे सर हे होते.
कै. विमलताई माध्यमिक विद्यालय दवनहिप्परगा येथे इयत्ता 10 वीच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना इंग्रजीबद्दल मार्गदर्शन करत होते. इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना शंकर कुद्रे सर बोलत होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी इंग्रजी भाषा सोप्या पद्धतीने शिकवून दाखवले, पाच मिनिटात इंग्रजीचा एक प्रयोग प्रॅक्टिकली करून दाखवले. विद्यार्थ्यांची इंग्रजीबद्दलची भीती नाहीशी केले. त्यांचा पाच मिनिटात इंग्रजीचा प्रयोग विद्यार्थ्यांना खूप आवडला.
यावेळी शाळेतील पाटे सर,सूर्यवंशी सर,कुलकर्णी सर,सिद्धेश्वरे सर,गोपवाड सर,शेळके सर, बेद्रे सर, तसेच श्री. वाडकर, जगन्नाथ चिद्रे, धनराज बामणे,इत्यादी शिक्षक, इतर शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleजालना शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीची कार्यकारणी जाहीर
Next articleखेड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here