Home अमरावती प्रा.प्रणित देशमुख यांना सैनिक फेडरेशन चा पुरस्कार

प्रा.प्रणित देशमुख यांना सैनिक फेडरेशन चा पुरस्कार

81
0

आशाताई बच्छाव

IMG_20240210_214650.jpg

प्रा.प्रणित देशमुख यांना सैनिक फेडरेशन चा पुरस्कार
. मयुर खापरे चांदुर बाजार स्थानिक गो.सी टोम्पे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदूरबाजार येथे स्व. संजय टोम्पे व समीर देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित सैनिकांना समर्पित रक्ततुला कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये जवळपास दीडशे पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले. शहीद स्व. ओंकार चिंधुजी मासोतकर यांच्या पत्नी श्रीमती सरस्वती मासोतकर यांची रक्ततुला करण्यात आली. सन 2012 – 13 पासून संस्थेचे अध्यक्ष श्री. भास्करराव टोम्पे यांनी देशासाठी शहीद झालेल्या कुटुंबातील सदस्यांच्या रक्ततुलेने रक्तदान करण्याचे ठरवले तेव्हापासून शहीद पत्नी किंवा आई-वडिलांची रक्ततुला करून स्मृतिदिन साजरा करण्यात येतो. संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. भास्करराव टोम्पे यांनी सैनिकांच्या या सर्व कामाची जबाबदारी प्रा. प्रणित देशमुख यांच्याकडे सोपवली तेव्हापासून ते निष्ठेने हे कार्य पार पाडत आहे .गेल्या दशकभरात माजी सैनिक व शहीद सैनिकाच्या सन्मानार्थ त्यांनी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून अतुलनीय कामगिरी बजावली त्याकरिता सैनिक फेडरेशन कडून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अशा प्रकारचे कार्य करताना निष्ठा आणि सातत्य राखून समाजासमोर एक नवा आदर्श त्यांनी ठेवला आहे.
2004 पासून स्व. संजय टोम्पे आणि समीर देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ तेव्हापासून तर आजतागायत त्यांच्या स्मृतिदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते त्याची धुरा अत्यंत जबाबदारीने तेवढ्या शिस्तीने त्यांनी पेलली आहे. हा पुरस्कार सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनात श्री धीरज राजे सातपुते सचिवसैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य व तालुक्यातील बहुसंख्य माजी सैनिकांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय प्रा प्रणित देशमुख यांनी संस्थेचे अध्यक्ष मा.भास्कर दादा टोम्पे मा. विजयराव टोम्पे, सर्व सहकारी बंधू यांना देतात.

Previous articleखेड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन !
Next articleमहाविद्यालय वार्षिक गुणवत्ता हमी अहवाल विद्यापीठांना केव्हा पाठविणार?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here