Home अमरावती महाविद्यालय वार्षिक गुणवत्ता हमी अहवाल विद्यापीठांना केव्हा पाठविणार?

महाविद्यालय वार्षिक गुणवत्ता हमी अहवाल विद्यापीठांना केव्हा पाठविणार?

22
0

आशाताई बच्छाव

IMG_20240210_214938.jpg

महाविद्यालय वार्षिक गुणवत्ता हमी अहवाल विद्यापीठांना केव्हा पाठविणार?
———
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम ९५च्या तरतुदी नुसार सर्व सलग्णित महाविद्यालये, संस्थांना वार्षिक गुणवत्ता हमी अहवालाची प्रत विद्यापीठ कडे पाठवणे क्रमांश आहे. मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सलग्णित४०५ पैकी केवळ ५० महाविद्यालयाची एक्यु एअर विद्यापीठ कडे पाठविणे आहे. परिणामी विद्यापीठच्या आय.क्यु.ए.सी. विभागाने वार्षिक गुणवत्ता हमी अहवालाची छायांकित प्रत पाठविण्याबाबत महाविद्यालयांना नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम ९५च्या तरतुदीनुसार सर्व सलग्नित महाविद्यालय, संस्थांना वार्षिक गुणवत्ता हमी अहवालाची प्रत विद्यापीठ कडे पाठवणे क्रमप्राप्त आहे. तसेच व्यवस्थापन परिषदेच्या प्राप्त निदर्शनानुसार महाविद्यालयांनी एक्युएआर बंगरुळयेथे नॅक कार्यालयाकडे सादर केल्यानंतर तीन महिन्याच्या आत विद्यापीठ कडे सादर करणे आवश्यक आहे. परंतु अमरावती विद्यापीठ सलग्नित ४०५ महाविद्यालय असून त्यापैकी ३८० महाविद्यालय”नॅक”मध्ये समाविष्ट आहेत. असे असताना आतापर्यंत केवळ ५० महाविद्यालयांनी विद्यापीठ कडे एक्युएआर सादर केले आहे. त्यामुळे उच्च शिक्षणात नियमावली, कायद्याची कशी वाट लावली जात आहे, हे दिसून येते. अनुदानित महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांना युजीसीकडुन अनुदान प्राप्त मात्र युजीसीकडुन नियमाचे अंमलबजावणी करण्यात चालढकल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाविद्यालय अथवा शैक्षणिक संस्था या दरवर्षी”नॅक”कडे एक्युएआर पाठवितात. त्याचा वार्षिक गुणवत्ता हमी अहवालाची एक प्रत विद्यापीठ कडे सादर करणे अनिवार्य आहे. महाराणा विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम ९५ मध्ये तशी तर तुद आहे. त्यानुसार एक्युएआर पाठविण्यासाठी प्राचार्य, संचालकांना नोटीसद्वारे अवगत केले आहे. असे डॉ संदीप वाघमोडे संचालक आय.क्यु.ए.सी. अमरावती विद्यापीठ यांनी माहिती दिली.

Previous articleप्रा.प्रणित देशमुख यांना सैनिक फेडरेशन चा पुरस्कार
Next articleरिपब्लिकन पक्षाच्या नांदेड(दक्षिण) जिल्हा विभागाची मुखेड येथे बैठक.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here