Home माझं गाव माझं गा-हाणं पिंम्पळनेर -ताहाराबाद – सटाणा महामार्गाची दैनिय अवस्था ,रस्ताची अक्षरशा चाळण . नागरिक...

पिंम्पळनेर -ताहाराबाद – सटाणा महामार्गाची दैनिय अवस्था ,रस्ताची अक्षरशा चाळण . नागरिक जिवमुठीत धरून प्रवास करत आहे

690
0

राजेंद्र पाटील राऊत

पिंम्पळनेर -ताहाराबाद – सटाणा महामार्गाची दैनिय अवस्था ,रस्ताची अक्षरशा चाळण . नागरिक जिवमुठीत धरून प्रवास करत आहे
सटाणा,(जगदिश बधान विशेष प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
गेल्या ६ महिन्यानपासुन पिंम्पळनेर – ताहाराबाद – सटाणा राष्ट्रीय महामार्ग संम्बधित कंम्पनिने खोदुन ठेवला आहे त्यामुळे रस्त्यावर वाहन चालवणे बेजार झाले आहे . गेल्या ६ महिन्यात अनेक अपघात होऊन अनेकांनी आपले प्राण गमावले आहे तरी संम्बधित रस्ता बनवणार्या कंम्पनीस सदर लोकप्रतिनिधी , शेतकरी नेते ,सामाजिक कार्यकर्ते ,प्रशासनाने जाब विचारावा . आज पिंम्पळनेर महामार्गावर कांद्याचे ट्रँक्टर घेऊन जाण्याची वेळ आली असता सदर प्रकार पाहिला व अत्यंत संताप झाला . हजारो वाहनांनी पिंम्पळनेर – ताहाराबाद – सटाणा महामार्गावर प्रवास करणेच टाळले आहे .त्यांनी अन्य ईतर पर्यायी मार्ग वापरत आहे . पण शेतकऱ्यांना बिचार्यांना आपला कांदा वाहतुक ट्रँक्टर ,पिक अप ,रिक्षा ,टँम्पो याच वहानातुन कराविच लागते. अति खराब झालेल्या रस्त्यावरूनच कांदा वहातुक करतांना दिवसाच घाम फुटतो .अंगावर काटे येतात . वहान कंन्ट्रोल करून करून गेयर बदलुन बदलुन जिव मेटाकुटीस येतोय . अनेक ठिकाणी रूंद रस्ता ,शेकडो ठिकाणी मोठ मोठे खड्डे . रस्ते बनवणार्या कंम्पनिने सदर अपघातग्रस्त वळणावर ,काम सुरू आहे अशा ठिकाणी दिशादर्शक फलक लावावे , योग्य ठिकाणी बँरेकेस्ट लावावे , अनेक ठिकाणी रस्त्यावर रेडियम लावणे गरजेचे आहे व अन्य ऊपाय योजना करणे महत्त्वाचे आहे . फक्त वेळ कमी आहे म्हणुन वरवर काम होता कामा नये .तसे होत असल्यास स्थानिक प्रशासन ,लोकप्रतिनिधी ,पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते ,शेतकरी नेते यांनी संम्बधित कंम्पनीच्चा रस्ते कामाची चौकशी करावी व सध्या वहातुक करत असलेला रस्ता डागडुजी करावा . अनेक ठिकाणी झालेल्या कामावर पाणी मारलेले नाही . काय योग प्रकारे शासनाचे मानंकणाप्रमाणे होत आहे का ते पाहिले पाहिजे . आज जिथे काम सुरू आहे तेथेच रस्त्याच्या परिघात अनेक विज मंडळाचे पोल येत आहे अगोदर ते लांब शिफ्ट होणे महत्त्वाचे आहे . विविध शासकीय यंत्रणेत ताळमेळ दिसत नाही .याचा सर्व त्रास सर्वसामान्य जनतेला ,शेतकऱ्यांना होत आहे .तरी माझ्या सर्वच शेतकरी नेत्यांना नम्र विनंती ,आवाहन आहे आपण सर्व नेत्यांनी एक, एक कांद्याचे भरलेले लोडिंग ट्रँक्टर पिंम्पळनेर ते सटाणा ,पिंम्पळगाव बं. येथील मार्केट पर्यंत पोहचुन दाखवावे तेव्हा आपणास कळेल शेतकरी व वहातुक दारास किती त्रास होतोय . कांदा पिकवणे सोपे झाले आहे पण तो मार्केट मध्ये विकणे कठीण होऊन बसले आहे . अनेक कांद्याचे ट्रँक्टर या रस्त्यावर अपघातग्रस्त झालेले आहे .अनेकांच्चा वहानांचे नुकसान झाले आहे .तरी संम्बधित सर्वच माझ्या लोकप्रतिनिधीनी यांची गंभिर दखल देऊन एकदा या कामाची पहाणी करावी
✍🏻

Previous articleपत्रकाराला धमकी
Next articleमा. खा. भावना ताई गवळी यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेले नगर उथाण रस्ते विकास योजने
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here