Home अमरावती २०१च्या शासन निर्णय नुसार वस्तीगृह सुविधा नसल्याचा आरोप. वस्तीगृहात नाही पाणी, आदिवासी...

२०१च्या शासन निर्णय नुसार वस्तीगृह सुविधा नसल्याचा आरोप. वस्तीगृहात नाही पाणी, आदिवासी विद्यार्थ्यांचा उपयुक्त संख्या दलानात ठीय्या.

33
0

आशाताई बच्छाव

IMG_20231214_070242.jpg

२०१च्या शासन निर्णय नुसार वस्तीगृह सुविधा नसल्याचा आरोप. वस्तीगृहात नाही पाणी, आदिवासी विद्यार्थ्यांचा उपयुक्त संख्या दलानात ठीय्या.
————–
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
शहरातील सोनल कॉलनी परिसरात भाड्याच्या इमारतीमध्ये असलेले आदिवासी वस्तीगृह मागील चार दिवसापासून पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. तसेच शासनाच्या निर्देशानुसार, अशोक सोयीसुविधाही वस्तीगृहात मिळत नाही. त्यामुळे संतप्त आदिवासी विद्यार्थ्यांनी मंगळवारी अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग येथे धडक देत उपयुक्त्याच्या दलाला आंदोलन केले. आदिवासी विकास विभाग वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शहरी भागात उच्च शिक्षण घेता यावे, याकरिता 1000 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वस्तीगृह चालवण्यात येत आहे; परंतु शहरातील आदिवासी वस्तीगृहाचे स्वतःचे इमारत नसून भाड्याच्या इमारतीमध्ये ही वस्तीगृह आहेत. वस्तीगृहामध्ये आवश्यक सोयी सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. मागील चार दिवसापासून सोनल कॉलनी येथील वस्तीगृहात पिण्याच्या पाण्याबरोबर दैनिक दिन वापरासाठी लागणारे पाणी नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अशी परिस्थिती असताना देखील वस्तीगृहातील वार्डन१५ दिवसापासून वस्तीगृहात आलेले नाहीत. तसेच वस्तू वस्तीगृहामध्ये शासनाच्या २०११च्या शासन निर्णय नुसार, प्रत्येक वस्तीगृहात स्वातंत्र्य ग्रंथालय, दहा विद्यार्थ्यांमध्ये एक कम्प्युटर व इंटरनेट सुविधा, प्रत्येक वस्तीगृहात स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टर बसविणे, दर महिन्यातून एक वेळा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे, व्यायाम साठी जिमची व्यवस्था करणे, दररोज वस्तीगृहाच्या स्वच्छता, स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकाची सुविधा त्याचबरोबर चार ते पाच वृत्तपत्र अशी सुविधा देणे अपेक्षित आहे. परंतु वस्तीगृहात यापैकी कोणत्या सुविधा नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या मागणीला घेऊन विद्यार्थ्यांनी मंगळवारी आदिवासी विकास विभाग उपायुक्त कार्यालयात हे आंदोलन केले. यावेळी उपयुक्त जागृती कुमारे यांनी विद्यार्थ्यांना दिलेली लेखी आश्वानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Previous articleराज्यात कारागृहामध्ये २ हजार२३७ पदांना मंजुरी, पण भरती केव्हा.
Next articleदि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बैंक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here