Home बुलढाणा दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बैंक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक...

दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बैंक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान संपन्न

66
0

आशाताई बच्छाव

IMG_20231214_070612.jpg

दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बैंक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान संपन्न
स्वप्निल देशमुख सह संपादक युवा मराठा न्यूज
वानखेड :दिनांक 13 12 2023 रोजी वानखेड शाखेंतर्गत येत असलेल्या वानखेड या गावी राबविण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम सेवा अध्यक्ष श्री नंदकिशोर चांडक प्रमुख अतिथी म्हणून श्री दिलीप देशमुख श्री गुलाबराव लोणाग्रे श्री वसंतराव देशमुख बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्री ठाकरे साहेब व विभागीय विकास अधिकारी श्री देशमुख साहेब उपस्थित होते.सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरवाडे साहेब यांनी केले. तसेच बँक देत असलेल्या ऑनलाइन सुविधे बाबत वानखेड शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री गाडकर साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. बँकेचे विभागीय विकास अधिकारी श्री देशमुख साहेब यांनी थकीत कर्जदार सभासदांना बँक राबवित असलेल्या अतिरिक्त व्याज सवलत व सरळ व्याज सवलत योजने अंतर्गत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच नियमित कर्जाचा भरणा केल्यामुळे आपल्याला काय फायदा होऊ शकतो याबद्दलही व बँकेने सुरू केलेल्या ठेव वाढ मास योजने बाबत सुद्धा मार्गदर्शन केले. नंतर मान्यवरांनी बँकेप्रती मनोगत व्यक्त करून उपस्थित मंडळी ला जिल्हा बँकेत जास्तीत जास्त व्यवहार करण्याचे आवाहन केले. या कॅम्प अंतर्गत 1 सभासदांनी 75,000 रुपये बचत ठेव मध्ये जमा केले व दीप लक्ष्मी ठेव योजना मध्ये दोन सभासदांनी रु 1,50,000/_ जमा केले.1 माहेवार खाते व 2 सेव्हिग खाते उघडण्यात आले.शेवटी आभार प्रदर्शन श्री ढगे साहेब विकास अधिकारी यांनी केले.

Previous article२०१च्या शासन निर्णय नुसार वस्तीगृह सुविधा नसल्याचा आरोप. वस्तीगृहात नाही पाणी, आदिवासी विद्यार्थ्यांचा उपयुक्त संख्या दलानात ठीय्या.
Next articleटोम्पे महाविद्यालयात जागतिक मानवाधिकार दिन साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here