Home अमरावती टोम्पे महाविद्यालयात जागतिक मानवाधिकार दिन साजरा

टोम्पे महाविद्यालयात जागतिक मानवाधिकार दिन साजरा

29
0

आशाताई बच्छाव

IMG_20231214_074925.jpg

टोम्पे महाविद्यालयात जागतिक मानवाधिकार दिन साजरा

चांदूरबाजार,(मयुर खापरे)
चांदूरबाजार येथील टोम्पे महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग आणि आयक्युएसी अंतर्गत जागतिक मानवाधिकार दिनानिमित्य व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, प्रमुख वक्ते म्हणून डॉ.मंगेश अडगोकर, इंग्रजी विभाग प्रमुख आणि प्रमुख अतिथी डॉ. ज्ञानेश्वर वांरगे , इतिहास विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. प्रशांत सातपुते, राज्यशास्त्र विभाग प्रमूख, प्रा. रोशन ठाकरे व प्रा.हरिओम वांगे यांनी उत्कृष्ट रित्या कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडली. प्रमुख वक्ते डॉ. मंगेश अडगोकर यांनी उपस्थितांना मानवधिकाराबाबत विविध विषयाचे उदाहरणासह मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी प्रा. ज्ञानेश्वर वारंगे मानवी हक्क आणि बालक व महिलांच्या समस्या सांगून त्यावर उपाय योजने बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.राजेंद्र रामटेके यांनी मानवाधिकाराची आज का आवश्यकता आहे या विषयावर विवेचनात्मक व तुलनात्मक अभ्यासपूर्ण भाष्य केले. जगातील मानवाधिकाराच्या सुरवातीचा इतिहास मांडताना विविध संघटनेच्या अथक प्रयत्नाने संपूर्ण जगाला मानवाधिकाराची देन मिळाली. पुढे बोलतांना अधिकार देणारी यंत्रणा व अधिकाराची अंमलबजावणी करणारी यंत्रणा चांगली असावी त्याशिवाय मानवाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. मानवी अधिकार हे नैसर्गिक असून जगातील सर्व देशात ते लागू होतात त्यामध्ये जगण्याचे स्वातंत्र, शिक्षणाचे अधिकार, सामाजिक अधिकार कुठलाही भेदभाव न करता मिळायला पाहिजेत अशा प्रकारचे विचार आपल्या वक्तव्यात मांडले. भारतात मानवाधिकार कायदयाची सुरवात केव्हा झाली याची विस्तृत माहिती देत मानव अधिकार दिवस साजरा करण्यामागे मानवी अधिकाराचा प्रचार व प्रसार व्हावा व सर्व नागरिकांना आपले अधिकाराची जाणीव व्हावी हा आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता असे मत डॉ. प्रशांत सातपुते यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोनाली तायडे हीने केले तर पाहूण्यांचा परिचय प्रा. डॉ. प्रशांत सातपुते यांनी दिला. कार्यक्रमाचे आभार प्रा. हरी ओम वांगे यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे बहूसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here