• Home
  • 🛑 *ज्येष्ठ नेते शरद पवार कोल्हापूरात आल्यानंतर याच गाडीतून फिरण्यास देतात पसंती* 🛑

🛑 *ज्येष्ठ नेते शरद पवार कोल्हापूरात आल्यानंतर याच गाडीतून फिरण्यास देतात पसंती* 🛑

🛑 *ज्येष्ठ नेते शरद पवार कोल्हापूरात आल्यानंतर याच गाडीतून फिरण्यास देतात पसंती* 🛑
✍️ कोल्हापूर:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

कोल्हापूर :⭕ कांतीशेठ चोरडिया व्यापारी वृत्तीचे. व्यवसायातून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्याचा त्यांचा अट्टहास. आयुष्यात काहीतरी ‘युनिक’ करावं, या हेतूने त्यांनी ऑटोमोबाईलच्या क्षेत्रात पाय ठेवला.

कोल्हापुरात १९७६ ला त्यांच्या व्यवसायास प्रारंभ झाला. मुलगा राहुल व विशाल चोरडिया यांनी वडिलांच्या वाटेवरच पाऊल ठेवले. व्यवसायातील प्रगतीने कुटुंबात गाड्यांचा ताफा लागला. आजवर घराच्या अंगणात अनेक गाड्या आल्या. त्यांची नावे आठवायचे ठरवले तरी ते चोरडिया कुटुंबीयांना शक्‍य नाही.

गाड्यांच्या नंबरबाबत मात्र तसे घडत नाही. चोरडिया कुटुंबाच्या गाड्या व १५१५ नंबर त्यांची वेगळी ‘इमेज’ तयार करणारा ठरलाय.मुक्त सैनिक वसाहतीत एक हजार चौरस फूट जागेत चोरडियांचा ऑटोमोबाईलचा व्यवसाय सुरू झाला. बजाज टेम्पोची डीलरशिप त्यांच्याकडे होती. ‘ग्राहक देवो भव,’ वर त्यांची श्रद्धा कायम होती.

तिचा महिमा अल्पावधीत प्रकटला. कोल्हापूरसह परजिल्ह्यातील ग्राहक त्यांच्याकडे आकर्षिला गेला. गाड्यांमधील क्वालिटी, उत्कृष्ट सेवा, ग्राहकांचे आदरतिथ्य व्यवसायाला भरभराट देणारे ठरले. चोरडिया कुटुंबीयांनी ग्राहकांचा विश्वास अल्पावधीत मिळवला. लक्ष्मी देवता त्यांच्यावर प्रसन्न झाली. पाच-सहा वर्षात शोरूमसाठी नवीन जागा निवडण्यात आली. मोठ्या जागेत व्यवसाय सुरू झाला.

चोरडिया यांच्या शोरूममधून गाड्यांची विक्री सुरू होती. ग्राहक गाड्यांची पसंती करताना वैशिष्ट्यपूर्ण नंबरचा हट्ट धरत होते.

चोरडिया कुटुंबीयांनाही त्यांच्या गाड्यांचा नंबर वेगळा असावा, असे वाटणे साहजिक होते. सुमारे वीस वर्षांपूर्वी प्रत्येक गाडीला सेम नंबर घेण्याचा प्रघात पडला. चोरडिया कुटुंबाने त्यांच्या गाड्यांसाठी १५१५ नंबर घेतला. तो घेण्यामागे खास लॉजिक अजिबात नव्हते. केवळ नंबर लकी ठरतोय, अशी त्यांची भावना झाली. नंबरचा महिमा ग्राहकांत चर्चेचा ठरला.

पुढे चोरडियांच्या व्यवसायाची कक्षा रुंदावली.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये शोरूम्सचा नारळ फुटला. ऑटोमोबाईलमधील  ब्रॅंड त्यांच्या शोरूममध्ये झळकले. फोर्ड, हुंडाई, रेनॉल्ड, फोक्‍स वॅगन, मॉरीस अशा नामांकित ब्रॅंडसह जनरल मोटर्सची विक्री शोरूममधून होऊ लागली.

चोरडिया कुटुंबात नव्या गाड्या खरेदी झाल्या. राहुल व विशाल चोरडिया यांच्याकडे व्यवसायाची सूत्रे आहेत. दोघे भाऊ हॉटेल पंचशीलचा कारभार सांभाळत आहेत. राहुल यांचा मुलगा रौनकने लंडनमधील नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीतून बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्याचे व्यवसायात पदार्पण झाले आहे.

व्यवसायातील यशस्वीतेबरोबरच चोरडिया कुटुंबाच्या १५१५ नंबरची भुरळ अनेकांना पडली आहे.नंबरसाठी पैसे मोजण्याची तयारी ग्राहकांनी ठेवली आहे.

हा नंबर आता सहजासहजी मिळणे कठीण आहे. विशाल चोरडिया म्हणतात, ‘आमचे काका ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे क्‍लासमेट. त्यांच्याशी आमचे घनिष्ठ संबंध आहेत.

ते कोल्हापुरात आल्यानंतर १५१५ गाडीतून काही वेळेस प्रवासही करतात. परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा नंबर परिचित झाला आहे.’…⭕

anews Banner

Leave A Comment