• Home
  • 🛑 *अखेर सुशांतच्या १५ कोटी रुपयांचा हिशोब लागला; स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा* 🛑

🛑 *अखेर सुशांतच्या १५ कोटी रुपयांचा हिशोब लागला; स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा* 🛑

🛑 *अखेर सुशांतच्या १५ कोटी रुपयांचा हिशोब लागला; स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा* 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात वेगवेगळे खुलासे सतत समोर येत असल्याने या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढत चालला आहे. याचबरोबर सुशांतच्या आत्महतेनंतर सुशांतच्या १५ कोटी रुपये कुठे गायब झाले ? असा सवाल सुशांतच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला.

याच मुद्द्याला धरून इंडिया टुडेने स्टिंग ऑपरेशन केले आहे. सुशांतकडे असलेल्या एवढ्या मोठ्या रकमेचे नेमके काय झाले ? याबाबत रियाने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. यावेळी रियाने दिग्दर्शक रुमी जाफरी आणि निर्माते वासू भगनानी यांच्याकडून मिळालेल्या ऑफरविषयी माहिती दिली आहे.

यावेळी रिया म्हणाली, ‘ही फेब्रुवारी महिन्यातील गोष्ट होती. सुशांत आणि वासू सर यांच्यासोबतच्या बैठकीत 15 कोटी रुपयांची सायनिंग अमाऊंट देण्यावर मान्य झाल्याची शक्यता आहे. यामुळे सुशांत खूशही होता,’ असे ती म्हणाली होती.

मात्र या डीलबाबत सुशांतसोबत कोणतेही अॅग्रीमेंट साईन झाले नव्हते. परंतु मे पासून शुटिंग सुरु होणार होते. मात्र लॉकडाऊनची घोषणा झाली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही व्यवहार झाला नाही.

अॅग्रीमेंटवर काम मार्च, एप्रिलमध्ये होणार होते, अशी माहिती रियाने दिली. दरम्यान, या बाबत रूमी जाफरी यांच्याशी देखील संपर्क साधला. ते म्हणाले, ‘हा व्यवहार फक्त तोंडी होता. औपचारिक पद्धतीने साईन नसताना १५ कोटी रुपये देण्याचा प्रश्नच येत नव्हता.

कोणत्याही अभिनेत्यांना पैसे हप्त्या हप्त्याने दिले जातात. अॅग्रीमेंटवेळी १० टक्के, प्री प्रॉडक्शनवेळी ५ टक्के, उर्वरित रक्कमही अशाच पद्धतीने देण्यात येते, असे ते म्हणाले….⭕

anews Banner

Leave A Comment