Home उतर महाराष्ट्र दारुड्यानं ‘त्या’ मागासवर्गीय तरुणाला विवस्त्र करत केली अमानुष मारहाण ; सोनई पोलीस...

दारुड्यानं ‘त्या’ मागासवर्गीय तरुणाला विवस्त्र करत केली अमानुष मारहाण ; सोनई पोलीस ठाण्यात ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल

183
0

आशाताई बच्छाव

IMG_20231214_092240.jpg

दारुड्यानं ‘त्या’ मागासवर्गीय तरुणाला विवस्त्र करत केली अमानुष मारहाण ; सोनई पोलीस ठाण्यात ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल.                                   नेवासा,( कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी)-

नेवासे तालुक्यातल्या सोनई – घोडेगाव लगतच्या एका हॉटेलसमोर एका दारुड्याने दुसऱ्याला बेदम मारहाण करत विवस्त्र करुन रस्त्याच्या कडेला टाकून दिलं. सदर तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहिल्यावर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. त्या तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्यानं तो गंभीर जखमी झाला आहे.

‘डोक्या’ या टोपणनावानं प्रसिद्ध असलेला हा तरुण सोनईत ठिकठिकाणी फिरत होता. अनेकांना काम मागत एखादं छोटंसं काम मिळालं, की त्यातले बरेचसे पैसे दारुवर खर्च करायचा. सोनईच्या बसस्थानक परिसरासह स्वामी विवेकानंद चौक, शिवाजी चौक, सोनई – राहुरी रोड, राजवाडा आदी भागांत हा तरुण नेहमी फिरत असल्याचं अनेकांनी पाहिलं आहे. दरम्यान, काल (दि. १3) रात्री उशिरा एका दारुड्यात आणि या तरुणाची बाचाबाची झाली. या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं.

या मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या असून त्याला उपचारासाठी पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मारहाणीच्या घटनेप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात भादंवि ३०७ आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोनई आणि परिसरात उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत आहेत. सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

Previous articleटोम्पे महाविद्यालयात जागतिक मानवाधिकार दिन साजरा
Next articleलेफ्टनंट चषक पटले युवकांचा आदर्श: – आय.पी.एस.लोहित मतानी ( तुमसर – मिटेवाणीत लेफ्टनंट चषक चा जंगी सत्कार )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here