Home नाशिक खेडले झुंगे विद्यालयात सहकार व शिक्षण महर्षी स्व मालोजी काका मोगल यांचा...

खेडले झुंगे विद्यालयात सहकार व शिक्षण महर्षी स्व मालोजी काका मोगल यांचा स्मृतिदिन साजरा

109
0

आशाताई बच्छाव

IMG-20230708-WA0026.jpg

खेडले झुंगे विद्यालयात सहकार व शिक्षण महर्षी स्व
मालोजी काका मोगल यांचा स्मृतिदिन साजरा

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

परम पूज्य तुकाराम बाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात सहकार महर्षी शिक्षण महर्षी निफाड तालुक्याचे आधारवड स्वर्गीय मालोजी काका मोगल यांचा विद्यालयात स्मृतिदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री.शिवाजी कोटकर सर, पर्यवेक्षक सुभाष शिंदे सर,ज्येष्ठ शिक्षक खडताळे सर ,भारती सर , श्री.साबळे सर,
श्री.वावधाने सर, श्री. पगार सर, श्री.क्षीरसागर सर, उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख श्री. केदार सर, श्री. चित्ते सर , श्री. आघाव सर, श्रीमती वैद्य मॅडम, श्री. गीते सर, श्री. जाधव सर, श्री. डमाळे सर, श्री दिघे सर श्री. गोसावी सर, श्री. सानप सर ,श्रीमती गीते एस आर मॅडम, गीते मॅडम ,आझादे मॅडम ,पगारे मॅडम ,पगार मॅडम, श्री. धोंगडे भाऊसाहेब, श्री. कांबळे मामा आणि इतर सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .सर्वप्रथम योगीराज तुकाराम बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्वर्गीय मालोजी काका मोगल यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री कोटकर सर आणि इतर सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी केले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री कोटकर सर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, ज्ञानाची गंगा घरोघरी नेण्याचे काम खऱ्या अर्थाने मालोजी काकांनी केले शिक्षण क्षेत्राबरोबरच नाशिक जिल्ह्यात सहकार क्षेत्रात केलेले काम खरोखर अतुलनीय आहे. मालोजी काकांनी सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भारती सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here