Home बुलढाणा इथे पैसे दिल्या शिवाय कामेच होत नाहीत; संग्रामपुर भूमी अभिलेख कार्यालय लाचखोरांचे...

इथे पैसे दिल्या शिवाय कामेच होत नाहीत; संग्रामपुर भूमी अभिलेख कार्यालय लाचखोरांचे माहेरघर.?

101
0

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0011.jpg

इथे पैसे दिल्या शिवाय कामेच होत नाहीत; संग्रामपुर भूमी अभिलेख कार्यालय लाचखोरांचे माहेरघर.?

(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी

संग्रामपुर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात अडचण असुन खोळंबा ठरत आहे. अधिकारी कुठे आहेत हे कर्मचाऱ्यांनार्यांना माहिती नाही आणि कर्मचारी काय करतात हे अधिकाऱ्यांना माहिती नाही, असा रामभरोसे कारभार या कार्यालयात सुरू आहे.संग्रामपुर येथील भूमी अभिलेख कार्यालयात नागरिकांवर अन्याय करणारी मुजोरी सुरू आहे. नागरीकांना वेठीस धरून आर्थिक लूट करण्यात भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी परिपक्व असुन अनेक कामासाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलेच हवालदिल झाले आहेे. कार्यालयातील भ्रष्टाचार उघडकीस येण्याच्या भीतीने अनेक दिवसापासून नियमबाह्य नक्कल करीता केलेल्या अर्जावर नक्कल मिळत नाहीत. व कार्यालयातील भ्रष्टाचारा बाबत अनेक तक्रारी असून जिल्हा भूमी अधिक्षक यांनी खातेनिहाय सखोल चौकशी करून यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. भूमी अभिलेख कार्यालयात अधिकृत कामे करण्यासाठी विनाकारण अडवणूक करत आर्थिक मागणी कार्यालयातील कर्मचारी व बाहेरील दलाला मार्फत होत असते .
कार्यालयातील काही कर्मचारी लायक नसूनही नकला तयार करण्याचे काम करीत असून ज्यांना तांत्रिक ज्ञान नसतानाही नक्कल तयार करण्याचे नियमबाह्य काम करत आहेत. अनेक नक्कलचे व मोजणीचे अर्ज नेहमीच प्रलंबित असतात. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही अशी परिस्थिती संबंधित अधिकाऱ्याकडून निर्माण केली जात आहे.वृद्ध शेतकऱ्यांना कार्यालयात ताटकळत उभे ठेवले जात आहे, उपअधीक्षक भूमि अभिलेख तथा विशेष उपअधीक्षक कार्यालय संग्रामपूर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आपल्या पदाचा दुरुपयोग केल्या जात असल्याचा आरोप सर्वसामान्यातून होत असल्याने त्यांच्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज असुन, आशा पद्धतीने शेतकऱ्यांनी व गरजूंनी त्यांच्या मोजणी कामासाठी व नक्कल साठी केलेल्या अर्जावर अतिरिक्त पैसे दिल्याशिवाय नक्कल मिळत नाहीत आणि पैसे न दिल्यास कित्येक महिने नक्कलचा अर्ज धुळखात पडून असतो हे पाहावयास मिळत आहे. अशाप्रकारे नागरिकांना वारंवार त्रास होत असल्याने अनेक तक्रारी होत आहेत. हे नियमबाह्य व बेकायदेशीर कामे होत असतांनाही कोणतीही कारवाई करीत नसल्याने संबंधित वरिष्ठ अधिकारी यांचाही अशा संग्रामपूर कार्यालयातील भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठबळ तर नाही ना.? अशी शंका उपस्थित होत आहे. तरी वरिष्ठ संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच
अशा बेजबाबदार लोकसेवकाची सखोल खातेनिहाय चौकशी करून तत्काळ दोशींवर निलंबनाची तसेच योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. जेणेकरून शेतकरी व नागरिकांचा महसूल विभागावर विश्वास राहील आणि न्याय मिळेल भविष्यात कारवाई न झाल्यास शेतकरी बांधवांसह नागरिकांना उपोषण करावे लागल्यास याबाबत आश्चर्य वाटायला नको.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here