Home नांदेड रावणगाव-भाटापुर येथील ग्रामसेवक जि.एस.पवळे विरोधात कार्यवाही नाही झाल्यास दि.१४ आँगस्ट रोजी आमरण...

रावणगाव-भाटापुर येथील ग्रामसेवक जि.एस.पवळे विरोधात कार्यवाही नाही झाल्यास दि.१४ आँगस्ट रोजी आमरण उपोषणाचा इशारा

40
0

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0013.jpg

रावणगाव-भाटापुर येथील ग्रामसेवक जि.एस.पवळे विरोधात कार्यवाही नाही झाल्यास दि.१४ आँगस्ट रोजी आमरण उपोषणाचा इशारा

पाच वर्षांपूर्वी म्रुत्य पावलेल्या व्यक्तीच्या नावे पैसे उचल्याचा प्रकार

मुखेढ प्रतिनिधी
संग्राम पाटील तांदळीकर

मुखेड तालुक्यातील मौजे रावणगाव व भाटापुर येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक जि.एस.पवळे यांनी पंतप्रधान आवास योजनेत मंजूर झालेल्या घरकुलाच्या बिलासाठी पैसे घेत आहेत व म्रत व्यक्तीच्या नावे खोटे नामे दर्शवुन शासनाकडून लुट करत आहेत असा आरोप रावणगाव येथील ग्रामस्थ परवेज अहेमदसाब शेख यांनी दि.०५ आँगस्ट रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती मुखेड यांना दिलेल्या एका लेखी निवेदनात म्हटला आहे.

सविस्तर वृत्त असे की,मुखेड तालुक्यातील मौजे रावणगाव-भाटापुर येथील ग्रामपंचायत या ना त्या कारणामुळे ग्रामपंचायतीने केलेल्या गैरकारभारा बाबत सतत तालुक्यात चर्चेला राहिली आहे. या अगोदरही या गावातील अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या अनियमिततेला कंटाळून वेळोवेळी संबधिताकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या पण अद्याप या ग्रामपंचायतीच्या अनियमिततेची म्हणावी तशी सखोल अशी चौकशी एकदाही करण्याचे धाडस प्रशासनाने दाखवले नाही. गटविकास अधिकारी मुखेड यांना २१ जानेवारी २०२२ व २८ मार्च २०२२ व २२ जुलै २०२२ व उपजिल्हाधिकारी साहेब देगलुर यांना दि.२७ जुलै २०२२ तसेच जिल्हाधिकारी नांदेड व मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांना १२ एप्रिल २०२२ असा लेखी स्वरुपात पत्रव्यवहार करूनही संबंधित ग्रामसेवकावर कसल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक अशी भूमिका घेऊन शेवटी दि.१४ आँगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती मुखेड समोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

येथील ग्रामपंचायतीचा गाडा एक राजकीय व्यक्ती सांभाळत असल्याने यांचे धागे दोरे नांदेड जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांसोबत असल्याने या ग्रामपंचायतीची सखोल अशी चौकशी एकदाही होत नाही असा आरोप येथील ग्रामस्थ करत आहेत. जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी लेखी तक्रारी करूनही,अनेक वेळा या ग्रामपंचायतीच्या अनियमीतते बद्दृल वर्तमानपत्रांतून बातम्या प्रसिद्ध होऊनही साधं चौकशी करण्याचे सोयीस्कर जिल्हा प्रशासन का करत नाही? असा सवाल येथील ग्रामस्थ हे करत आहेत.

मंजुर झालेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचे बिले काढण्यासाठी लोकांकडून पैसे घेणे व ज्या लाभार्थ्यांनी पैसे दिले नाही अशा लाभार्थ्यांची आँनलाईन त्रुटी काढून मुद्दाम बिल न काढने. बेसिमेंट न करता पैसे घेऊन जे लाभार्थी नियमात नसताना सुद्धा दुसरा हफ्ता देण्यात येतोच कसा? असा सवाल ही त्यांनी या निवेदनात केला आहे. पाच वर्षांपूर्वी म्रत पावलेल्या मयत व्यक्तीचे बिले काढण्यात आले असल्याचा असा गंभीर आरोपही त्यांनी या निवेदनात केला आहे. या निवेदनाच्या प्रती तहसील कार्यालया मुखेड व पोलीस स्टेशन मुखेड यांनाही देण्यात आले.
_________________________
रावणगाव-भाटापुर येथील ग्रामसेवक जि.एस.पवळे सारख्या अशा भ्रष्ट कर्मचाऱ्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा दि.१४ आँगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती मुखेड समोर आमरण उपोषणास बसेन.

ग्रामस्थ,परवेज शेख.

Previous articleतामलवाडीत वाढदिवसानिमित गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
Next articleइथे पैसे दिल्या शिवाय कामेच होत नाहीत; संग्रामपुर भूमी अभिलेख कार्यालय लाचखोरांचे माहेरघर.?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here