Home वाशिम जैन कला महाविद्यालयात भव्य वृक्षरोपण राष्ट्रीय सेवा योजनेचा पुढाकार -स्वस्तीक पँटर्ननुसार 2100...

जैन कला महाविद्यालयात भव्य वृक्षरोपण राष्ट्रीय सेवा योजनेचा पुढाकार -स्वस्तीक पँटर्ननुसार 2100 वृक्षाची लागवड

260
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230709-090631_WhatsApp.jpg

जैन कला महाविद्यालयात भव्य वृक्षरोपण राष्ट्रीय सेवा योजनेचा पुढाकार -स्वस्तीक पँटर्ननुसार 2100 वृक्षाची लागवड                                               वाशिम/ गोपाल तिवारी ब्युरो चीफ

अनसिंग येथील श्री पद्मप्रभ दिगंबर जैन कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने एक जुलै ते सात जुलै या पर्यावरण वनसप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन व स्वस्तिक पॅटर्नचे निर्माता षन्मुख नाथन (अंदमान) व प्राचार्य डॉ विवेक गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली 2100 वृक्ष लागवडीचा संकल्प करून तो संकल्प आज पूर्ण करण्यात आला. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वृक्षाशिवाय जीवन नाही, वृक्षशिवाय पर्यावरण संरक्षण नाही, वृक्ष हेच खऱ्या अर्थाने आमच्यासाठी जीवनाचे मूलभूत घटक आहेत, आमच्या जीवनाला आकार देणारे महत्त्वाचे केंद्रबिंदू आहेत. म्हणूनच या वृक्षाचं लागवड,संवर्धन करणे आज काळाची गरज बनलेली आहे. पर्यावरणाचे वाढते असंतुलन, ग्लोबल वार्मिंगमुळे दिसून येत असणारे वेगवेगळे स्वरूपाचे दुष्परिणाम यापासून वेळीच आपण जागे झाले पाहिजे. म्हणूनच राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने या सत्रात सुरुवातीलाच हा विशेष उपक्रम राबविण्याचा महाविद्यालयाने मानस ठेवला. त्या अनुषंगाने नियोजन करून स्वस्तिक पॅटर्ननुसार दोन एकर जागेमध्ये निंभोर, सागवान, कडूनिंब, कडू बदाम,सिताफळ,सप्तपर्णी आदी विविध जाती प्रजातीचे वृक्ष दोन बाय दोनच्या आंतराने लावण्यात आली. यासाठी श्री षण्मुख नाथन यांनी विशेष परिश्रम करून विद्यार्थ्यांना स्वस्तिक पॅटर्न म्हणजे काय? स्वस्तिक पॅटर्नच्या माध्यमातून लागवड केलेल्या वृक्षाचे पर्यावरणाच्या दृष्टीने, मेडिसिनच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने काय महत्त्व आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी,माजी विद्यार्थी सोबतच अनसिंग येथील साई कॉम्प्युटर व लोभिवंत कॉम्प्युटरचे वेगवेगळ्या बॅचचे अशा एकुण 109 विद्यार्थ्यांनी यावेळी विशेष पुढाकार घेतला. या माध्यमातून स्वस्तिक पॅटर्ननुसार 1650 तर महाविद्यालयाच्या इतर परिसरामध्ये उर्वरित वृक्ष लावून जवळपास २१०० वृक्षाचा संकल्प महाविद्यालयाने आज पूर्ण केला. यासाठी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. सचितानंद बिचेवार, सह कार्यक्रमाधिकारी, डाँ.अनिल जैन, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. वैशाली गोरे, प्रा. डॉ. विनोद राठोड, डॉ. पंकज शर्मा, डॉ. गजानन बनचरे, डॉ. हरीश घोडेकर, विनेश डहाळे, प्रशांत अहाळे, महेश अवस्थी, राजश्रीताई वाळली, सुनील वराडे,संजय जोगदंड,अनुसयाबाई तायडे,साहिल गोटे, विठ्ठल कापसे, कु. दिपाली मानवतकर, कु. सानिका वारे, विशेषता लोभियन कॉम्प्युटरचे संचालक राठोड सर व साई कॉम्प्युटरचे विठ्ठल राऊत महाविद्यालयाची माजी विद्यार्थी अनिल शिंदे आदींनी यासाठी विशेष परिश्रम केले.

Previous articleशेलुबाजार येथुन श्री अमरनाथ यात्रे करिता पहिला जथा रवाना..
Next articleखेडले झुंगे विद्यालयात सहकार व शिक्षण महर्षी स्व मालोजी काका मोगल यांचा स्मृतिदिन साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here