Home जळगाव वीज दरवाढ मागे घेण्याची चाळीसगाव कार्यकारी अभियंता यांना रयत सेनेची मागणी

वीज दरवाढ मागे घेण्याची चाळीसगाव कार्यकारी अभियंता यांना रयत सेनेची मागणी

18
0

आशाताई बच्छाव

1000271495.jpg

वीज दरवाढ मागे घेण्याची चाळीसगाव कार्यकारी अभियंता यांना रयत सेनेची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- राज्यात १ एप्रिल पासून नवीन वीज दरवाढ लागू करण्यासाठी महावितरण कंपनी ला शासनाने परवानगी दिल्याने सर्व सामान्य जनतेला विज दरवाढ परवडणारी नसल्याने राज्य सरकारने महावितरण कंपनीने केलेली दरवाढ तात्काळ मागे घेण्याचे आदेश करावेत यासाठी चाळीसगाव कार्यकारी अभियंता यांना रयत सेनेच्या वतीने दि ८ रोजी निवेदनाद्वारे केली आहे,मागणी ची दखल घेतली नाही तर कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर वीज ग्राहकांसह रयतसेना तीव्र आंदोलन छेडनार असल्याचा इशारा देण्यात आला आहे,
राज्यात १ एप्रिल पासून नवीन वीज दरवाढ लागू झाल्यास महावितरण कंपनी मार्फत वीज ग्राहकांना स्थिर आकार वाढविण्यात येणार आहे त्यातच इंधन अधिभार जोडल्यावर १० टक्के दरवाढ होणार आहे, घरगुती संवर्गातील सिंगल फेजसाठी पूर्वी ११६ रुपये लागायचे आता एक एप्रिल २०२४ पासून १२८ रुपये लागणार आहेत. वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार दरवाढ लागू केल्यास सर्वसामान्यांना ही दरवाढ परवडणारी नाही म्हणून शासनाने महावितरण कंपनीने केलेली विज दरवाढ त्वरित मागे घेण्यास आदेश करून वीज ग्राहकांना दिलासा द्यावा, ९ वर्षापासून दिल्ली मध्ये “केजरीवाल सरकारकडून” २००, युनिट प्रति महिना सर्व कुटुंबांना मोफत वीज दिली जाते. अणि गेल्या २, वर्षापासून पंजाब मध्ये भगवंत मान सरकार कडून ३००, युनिट पंजाब मधील प्रत्येक कुटुंबाला मोफत वीज दिली जाते. तरीही तेथील वीज कंपनी व राज्याचे बजेट फायद्यात आहे. महाराष्ट्रा मध्ये वीज कंपनी कडून सर्वात महाग वीज महाराष्ट्रातील जनतेला दिली जाते. अणि आता त्यामध्ये दि १ एप्रिल पासुन १०,% दरवाढ केली जात आहे, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस,पवार सरकार नक्की जनतेसाठी काम करीत आहे की महावितरण कंपनी चे भले करण्यासाठी काम करत आहेत असा प्रश्न जनतेमध्ये आहे. जनतेमधून निवडून यायचे आणि जनतेलाच वेठीस धरून आर्थिक भुरदंड लादायचा हे अन्याय कराक आहे . सरकार सर्व सामान्याचे नसून व्यापारी धार्जिणे असल्यामुळे जनता सर्व बाजूने त्रस्त झाली आहे, त्यात केलेली वीज दरवाढ परवडणारी नसल्याने राज्य सरकारने दरवाढ मागे द्यावी अन्यथा
वीज ग्राहक व रयत सेना चाळीसगाव महावितरण कंपनी कार्यालयासमोर येत्या ८ दिवसात तीव्र आंदोलन छेडेल यास सर्वस्वी महावितरण कंपनी व चाळीसगाव कार्यकारी अभियंता जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे,निवेदनाच्या प्रत ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य,पालकमंत्री जळगाव, आमदार चाळीसगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत,
निवेदनावर प्रदेश सहसंघटक ज्ञानेश्वर कोल्हे ,जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे ,स्वप्निल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष भरत नवले ,शहरअध्यक्ष छोटू अहिरे ,शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, शहर सहसंघटक दीपक देशमुख ,शहर उपाध्यक्ष सतीश पवार, मार्गदर्शक राजेंद्र पाटील, शहर संघटक शिवाजी गवळी, उमेश पवार , प्रा चंद्रकांत ठाकरे,शेतकरी दिलीप पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous articleपरळी शहरातील मोकाट जनावरांचा नगर परिषदेने बंदोबस्त करावा- सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.मनोज संकाये यांची मागणी
Next articleपथनाट्याद्वारे मतदानासंदर्भात चाळीसगाव येथे जनजागृती आणि प्रबोधन….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here