Home जळगाव पथनाट्याद्वारे मतदानासंदर्भात चाळीसगाव येथे जनजागृती आणि प्रबोधन….

पथनाट्याद्वारे मतदानासंदर्भात चाळीसगाव येथे जनजागृती आणि प्रबोधन….

25
0

आशाताई बच्छाव

1000271506.jpg

पथनाट्याद्वारे मतदानासंदर्भात चाळीसगाव येथे जनजागृती आणि प्रबोधन….
“मतदार राजा जागा हो !
चाळीसगाव, प्रतिनिधी विजय पाटील: तहसील कचेरी निवडणूक शाखा चाळीसगाव व स्विप कार्यक्रम अंतर्गत पंचायत समिती (शिक्षण विभाग )चाळीसगाव तर्फे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढविणे व जनजागृती होण्यासाठी या कार्यक्रमाचा उद्देश असून, ज्या गावात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५० टक्के पेक्षा कमी मतदान झाले होते, अशा मतदान केंद्राच्या अंतर्गत मोडणाऱ्या गावांमध्ये पथनाट्याचे सादरीकरण केले जात आहे.दिनांक : ६ एप्रिल २०२४ रोजी तहसील कचेरी स्वातंत्र्यवीर सावरकर चौक , एस.टी स्टँड आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शालिग्राम निकम लिखित ”मतदार राजा जागा हो ! ” या पथनाट्याचं सादरीकरण करण्यात आले .सहभागी कलाकार म्हणून रवींद्र कुमावत , सतीलाल सोनवणे ,कवी रमेश पोतदार, पांचाळ सर व शालिग्राम निकम यांनी आपल्या लज्जतदार सादरीकरणातून नवमतदार नोंदणी करणे ,वेळेत मतदान करणे, अपंग व वयोवृद्ध मतदारांना केंद्रापर्यंत ने आण करण्याची सुविधा देणे वा पोस्टल बॅलेट मतदान सुविधा उपलब्ध करून देणे,मतदान यंत्राबद्दल गैरसमज दूर करणे, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडणे, नोटा म्हणजे पैसे देणे घेणे नव्हे तर संबंधित बॅलेट पेपर वरील मतदारांना नाकारून कोणालाच मतदान न करणे म्हणजेच नोटा बटन दाबणे होय. यावेळी पटनाट्यातील कलाकारांनी मतदान करण्याबाबत जनतेला आवाहन करण्यात आले .तहसील कचेरी समोर पथनाट्य पाहण्यासाठी प्रांताधिकारी प्रमोद हिले साहेब, तहसीलदार प्रशांत पाटील , गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर , प्रभारी गटशिक्षणाधिकारी विलास भोई , शहर पोलीस निरीक्षक संदिप पाटील ,निवडणूक नायब तहसीलदार संदेश निकुंभ, शिक्षण विस्तार अधिकारी विनायक ठाकूर व जितेंद्र महाजन यांनी उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन केले. याचबरोबर कार्यक्रम यशस्वीतेसाठी साधन व्यक्ती प्रशांत पाटील , रविंद्र पाटील , निवडणूक कर्मचारी अरूण जाधव , तुषांत व इतर कर्मचारी उपस्थित होते . खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला .

Previous articleवीज दरवाढ मागे घेण्याची चाळीसगाव कार्यकारी अभियंता यांना रयत सेनेची मागणी
Next articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ‘समता चषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here