Home मुंबई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ‘समता चषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ‘समता चषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

110

आशाताई बच्छाव

1000271512.jpg

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ‘समता चषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

मुंबई : ( प्रतिनिधी विजय पवार)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती,भिमोसत्व समन्वय समिती वरळी आणि एन. एस. चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त ‘समता चषक २०२४’ बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन जांबोरी मैदान,वरळी मुंबई येथे करण्यात आले. या स्पर्धेत वरळी व मुंबईमधील बहुतांश विभागातून या स्पर्धेसाठी स्पर्धक उपस्थित होते त्यामुळे स्पर्धेमध्ये रंजकता निर्माण झाली. स्पर्धकांना प्रशस्तीपत्रके व बक्षिसांचे वाटप करण्यात आले. एन. एस. चेस अकॅडमीचे सर्वेसर्वा सुधाकर रोकडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांना बुद्धिबळ खेळाचे बहुमोल मार्गदर्शन केले वरळी विभागातील व मुंबईतील स्पर्धकांचे तसेच आयोजकांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Previous articleपथनाट्याद्वारे मतदानासंदर्भात चाळीसगाव येथे जनजागृती आणि प्रबोधन….
Next article११ एप्रिल पासून श्री क्षेत्र शिंदी येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ —
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.