Home अमरावती विजय ग्रंथ पारायण सोहळा सभा मंडपाचे भूमिपूजन–

विजय ग्रंथ पारायण सोहळा सभा मंडपाचे भूमिपूजन–

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20240119_074544.jpg

विजय ग्रंथ पारायण सोहळा सभा मंडपाचे भूमिपूजन————————–
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती (प्रतिनिधी) हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त 25 जानेवारी रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या पुढाकारात अमरावतीत विजय ग्रंथ सामूहिक पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. साईनगर बेनाम चौक स्थित भक्ती मंदिर नजीकच्या प्रांगणात 25 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता पारायण सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. या सोहळ्यासाठी भव्य दिव्य असा सभामंडप उभारण्यात येत असून सभामंडळ उभारणीच्या कामाचे भूमिपूजन शिवसेनेच्या उपनेत्या संजना घाडी व राजुल पटेल मुंबई यांच्या हस्ते पार पडले .या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी उपस्थितांना बाळासाहेब ठाकरे जयंती महोत्सवात आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली तसेच या सभामंडपात 5 हजार पेक्षा जास्त गजानन भक्तांच्या वसण्याची व पारायण वाचण्याची व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आसावरी देशमुख, विकास शेळके ,प्रकाश टॅटू ,विजय खंडारे ,सागर ढोके, प्रवीण सोयतकर ,विशाल वाटाणे ,इंद्रजीत नागदिवे, अनिल काळे ,विनोद खडसे ,विकास पांडे ,अनिल घड्याळजी ,रमेश धर्माधिकारी ,दत्ताभाऊ गर्गे, मनोरराव सातव ,अंबादासपंत बनारसे, प्रमोद कराळे, शशांक चुंबळे , आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here