Home मुंबई मुंबई (परळ )एसटी कर्मचारी संपास – मनसे विधी विभागाचा कायदेविषयक पाठिंबा 🛑

मुंबई (परळ )एसटी कर्मचारी संपास – मनसे विधी विभागाचा कायदेविषयक पाठिंबा 🛑

237
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 मुंबई (परळ )एसटी कर्मचारी संपास – मनसे विधी विभागाचा कायदेविषयक पाठिंबा 🛑
✍️ मुंबई : विजय पवार ( महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत सपांस पाठिंबा दिलेला असून त्याच अनुषंगाने आज जनहित कक्ष आणि विधी विभागाचे अध्यक्ष ऍड किशोरभाऊ शिंदे यांच्या सूचनेनुसार , महाराष्ट्र राज्य कनिष्ट वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटना यांच्या प्रतिनिंधी समवेत ऍड कीर्ती कुमार शिंदे यांच्या सह मिटिंग घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी आणि न्यायालयीन कामकाजाची चर्चा करण्यात आली

या प्रकरणाची सकाळी -१० हायकोर्टात सुनावणी असणार असून याच पार्श्वभूमीवर मुंबईतील परेल एस टी डेपो येथे वकिलांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन काही संबंधित कर्मचाऱ्यांशी मागण्यानं बाबत चर्चा करून त्यांना कायदेशीर पाठिंब्या साठी आश्वस्त केले.

विधी विभागाच्या शिष्टमंडळात विधी विभागाचे सरचिटणीस डॉ. ऍड. संतोष सावंत, ऍड अनिल गजने, ऍड रविंद्र पाष्टे, उपाध्यक्ष महेंद्र धनावडे, ऍड वसंत प्रभू , ऍड प्रांजल जाधव, ऍड सत्यम आचार्य, ऍड नितीश सोनवणे, ऍड तिलकपुरे, ऍड कोजल कदम, ऍड रीमा मौर्या, ऍड सुमीत घाग, ऍड. सुचेता नातू , निखिल सावंत आदी उपस्थित होते.⭕

Previous articleआरमोरीत सुव्यवस्थेत डांबरी रस्त्यावर ४६ लांखाचा अनावश्यक खर्च     
Next articleदूरदर्शन बातम्यांचा आवाज प्रदीप भिडे, यांचा ९ नोव्हेंबर वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जीवन प्रवासाची ही झलक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here