Home पुणे दूरदर्शन बातम्यांचा आवाज प्रदीप भिडे, यांचा ९ नोव्हेंबर वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जीवन...

दूरदर्शन बातम्यांचा आवाज प्रदीप भिडे, यांचा ९ नोव्हेंबर वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जीवन प्रवासाची ही झलक

111
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 दूरदर्शन बातम्यांचा आवाज प्रदीप भिडे, यांचा ९ नोव्हेंबर वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जीवन प्रवासाची ही झलक 🛑
✍️ पुणे : विलास पवार ( पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे: फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिकलेला, पुढे पत्रकारितेचा कोर्स ही पुण्याच्याच रानडे संस्थेतून केलेला हा तरुण दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील समस्त प्रेक्षकांचा लाडका वृत्त निवेदक बनला.

पुणे फेस्टिव्हलचे तर ते अनेकवर्षे सूत्र संचालक होते. रयत शिक्षण संस्थेच्या धामणीच्या (तालुका आंबेगाव ,जिल्हा पुणे ) शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले , पुण्याच्या संस्कारात वाढलेले

पुण्यात टीव्ही आला २ ऑक्टोबर १९७३ साली . तेंव्हा खूप कमी घरात टीव्ही सेट असे .वाड्यात एखाद्याकडेच हा विराजमान असे. इतर कोणत्याही वाहिन्या नसल्यामुळे यावरचे एकूण एक कार्यक्रम आवडीने बघितले जात .मनोरंजनाचा कार्यक्रमा पाठोपाठ भाव खाऊन जात त्या मराठी बातम्या . यात भक्ती बर्वे,, अनंत भावे ,चारुशीला पटवर्धन ,स्मिता तळवलकर आणि प्रदीप भिडे यांना तर स्टार सारखा भाव होता .

त्यावेळी अनेकजण प्रदीप भिडे यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडलेले होते .काय वैशिष्ट्य होते त्यांच्याकडे ? की ज्यामुळे त्यांना टीव्ही बाहेरही कार्यक्रमांना बोलावले जायचे विशेषतः सरकारी समारंभांना .

सुशीलकुमार शिंदेंजी आणि हर्षवर्धनजी पाटील यांचं वैशिष्ट्य हे की मुख्यमंत्री कोणीही असोत मंत्रिमंडळात यांची सीट पक्की.याच्याबाबत हेच घडलं सर्व महत्वाच्या शासकीय कार्यक्रमांना पहिली पसंती यांनाच मिळायची. मग ते शरदराव पवार असोत विलासरावजी देशमुख असोत ,नारायणराव राणे असोत, वा देवेन्द्रजी फडणवीस. सरकारी कार्यक्रमात डेकोरम सांभाळायचा असतो , प्रेक्षकांना हसवण्यासाठी अल्लड शेरेबाजी करायची नसते हे त्यांना अचूक ठाऊक असायचे .

अतिशय आश्वासक अशा आवाजाच्या पाठबळावर यांनी मराठी मधील किमान ५०% रेडिओ जाहिराती आपल्याला ३ दशके ऐकवल्या. ज्यावेळी मराठी साठी जाहिरातीची वेगळी संहिता लिहिली जायची. (आता इंग्रजीचे धेडगुजरी मराठी भाषांतर करून वेळ मारुन नेतात .)१९७५ ते २००५ असा सलग ३ दशकांचा काळ दूरदर्शनच्या मराठी बातमी पत्रावर निवेदक म्हणून याचं नाव ठळकपणे नोंदला गेलं. कांदिवली ते चर्चगेट आणि अंधेरी ते कुलाबा असा स्टुडिओ चा प्रवास करताना ध्वनिमुद्रणाची वेळ त्यांनी कधी चुकवली नाही. सिंगल टेक ओके हे तर त्यांच्याबाबत कायमच घडत आलं.

भाषा ,आवाज ,उच्चार ,भावना आणि संहितेची गरज याचे उत्तम भान ठेवल्यामुळे इतक्या जाहिराती , बातम्या वाचूनही हा मित्र over exposed कधी झाला नाही. बातम्या वाचता वाचत अनेक सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम यांनी रंगतदार केले . इतकी वर्ष निवेदन करूनही चोख होमवर्क करणाऱ्या सूत्रसंचालक ,निवेदक प्रदीप भिडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ⭕

Previous articleमुंबई (परळ )एसटी कर्मचारी संपास – मनसे विधी विभागाचा कायदेविषयक पाठिंबा 🛑
Next articleतामसवाडी ते शेगांव पायी दिंडीला प्रारंभ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here