राजेंद्र पाटील राऊत
आरमोरीत सुव्यवस्थेत डांबरी रस्त्यावर ४६ लांखाचा अनावश्यक खर्च गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-:आरमोरी नगरपरिषद लगतच्या डांबरी रस्त्याची स्थिती चांगली असतांनाही पैसाची उधळपट्टी करण्यासाठी पुन्हां त्याच रस्त्यावर ४६ लांख रुपयाचे काम आरमोरी नगरपरिषद कडून मंजुर करण्यात आले. सदर काम कंञाटदारांच्या कि इतर कोनाच्या फायद्यासाठी करण्यात येत आहे हे कळण्यात मार्ग नाही. सदर रस्ता दुरुस्थीच्या कामाची चौकशी करण्यात यावी.अशी माणनी होत आहे. आरमोरी जूना बस स्थानकाजवळुन तर नगर परिषद मार्गा रामाळा वैरागळ या रस्त्याचे दोन ती वर्षा पूवी प्रधानमंञी योजणेतुन डांमरीकरणाचे ग्रामसळक काम करण्यात आले होते.या रस्त्याची स्थिती चांगली असतांनाही आरमोरी नगरपरिषदने महारष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअंभियान योजना सन 2020 – 2021 या योजनेतुन प्रभाग क्रमांक 3 मधिल नगरपरिषद कार्यालय ते विजय ठवरे यांच्या घरापर्यंत 46 लाख 72 हजार 413 रुपयाचे काम मंजुर करुन टेंडरला काढले होते.सदर रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन आटोपले असुन कामाला सुरुवात झालेली आहे. प्रधानमंञी ग्रामसळक योजनेतुन तयार झालेल्याडांबरी रस्ता हंस्तातरित झाला नसतांना व जुन्या कंञाटदारांचा दोष निवारनाचा कालावधी संपण्या पुर्वीच त्याच कामावर डांबरीकरणाचे काम दुसर्यांदा करण्यात येत आहे. त्यामुळे लेव्हल मधिल रस्ता नगर परीषद कार्यालय ते विजय ठवरे यांच्या घरापर्यंत चढ होणार आहे. शहरातील अनेक वाढिव व जुन्या वस्थित समस्या असतांनाही त्या नगरपरिषद प्रशासन व अंभियंत्याला दिसल नाही काय ? कोणत्याही विकास कामे करतांना त्याचे योग्य नियोजन करुन मुलभुत समस्येला प्रधान्य द्यायला पाहीजे होते.पण तसे न करता अनावश्यक ठिकाणीं लाखोचा निधी खर्च केला जात आहे.यावरुन न.प.चा नियोजनशुन्य कारभार या निमित्याने चव्हाटयावर आला आहे. सदर रस्त्यावर होनारा अनावश्यक खर्च संबधिताकडुन वसुल करुन चौकशी करण्याची मागणी होत आहे.