Home नांदेड मुक्रमाबाद येथे मोफत स्ञी रोग तपासणी शिबीर संपन्न

मुक्रमाबाद येथे मोफत स्ञी रोग तपासणी शिबीर संपन्न

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20230122-WA0046.jpg

मुक्रमाबाद येथे मोफत स्ञी रोग तपासणी शिबीर संपन्न

६० रुग्णांची केली तपासणी

मुक्रमाबाद – प्रतिनिधी (बस्वराज स्वामी वंटगिरे युवा मराठा न्युज नेटवर्क)

मुक्रमाबाद येथील डॉ.सुधाकर रेड्डी किनीकर यांच्या नवजीवन हाॕस्पीटल येथे दि.२० शुक्रवार रोजी देगलूर येथील कै.डॉ. सुशिला एकलारे यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध स्ञीरोग तज्ञ डॉ. एस.एम.एकलारे, डॉ. कपील एस.एकलारे, डॉ. सौ.एस.के.एकलारे, यांच्यातर्फे मोफत स्ञीरोग रोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते .या शिबीरात तब्बल ६० रुग्णांची नोंदणी करुन तपासणी करण्यात आले. असून यामधील २५ रुग्णांचे पॕपस्मिअर तपासणी करुन त्यामधील गंभीर रुग्णांचे कमीत कमी खर्चात पुढील उपचार करण्यात येईल असे स्ञीरोग तज्ञ डॉ.कपील एकलारे यांनी सांगितले

यावेळी डॉ.असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.अनिल पंदीलवार, डॉ.पी.एम.पाटील, डॉ.व्यंकटेश भाटापूरकर, डॉ.अम्रपाली गायकवाड, सौ.अश्विनी रेड्डी, डॉ. अंतेश्वर सुवर्णकार, डॉ.मादाळे, डॉ.संगमेश्वर खंकरे, डॉ.अमोल एमेकर, डॉ.लिंगराज गंदीगुडे, डॉ.संजय गुजलवार, डॉ.अशोक चव्हाण, डॉ.तुकाराम हाळदेकर, डॉ.महेश खेंगटे, आदि उपस्थित होते.
या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ.अंजिताताई बोधने, ग्रा.प.सदस्य बालाजी पसरगे,ग्रा.प.सदस्य बालाजी बोधने, दिनेशअप्पा आवडके, पञकार अशोक लोणीकर, संतोष हेस्से, विनोद आपटे, दिगांबर शेळके, आदिंची उपस्थिती होती. याप्रसंगी मोफत स्ञीरोग तपासणी शिबीर आयोजित केल्याबद्दल शिबीराचे संयोजक डॉ.एस.एम.एकलारे यांचे काँग्रेस पक्षाचे युवानेते दिनेशअप्पा आवडके यांच्यातर्फे सत्कार करण्यात आले.

देगलूर येथील सुप्रसिद्ध संजीवन वूमन्स स्पेशालिटी हाॕस्पीटलचे संचालक तथा स्ञीरोग तज्ञ डॉ.कपील एकलारे यांनी आपल्या आई कै.डॉ.सुशिला एकलारे, यांच्या स्मरणार्थ मोफत स्ञीरोग तपासणी शिबीराचे आयोजन येरगी, मदनूर, मरखेल हणेगाव, करडखेड, आदमपूर,तमलूर, देगलूर, जाहूर, मुक्रमाबाद इत्यादी ठिकाणी करण्यात आले असून या शिबीरास प्रत्येक गावांतुन उत्सफुर्त प्रतिसाद मिळत असून या मोफत स्ञीरोग तपासणी शिबीराचे रुग्णांनी लाभ घ्यावे असे अवाहन डॉ.कपील एकलारे यांनी केले आहे.

Previous articleप्रथमच विस्वासानंतर चिंचवड विधानसभेला महिला अपक्ष उमेदवार आमदार म्हणून मिळणार का?
Next articleनाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here