Home Breaking News गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

195
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20230603-WA0040.jpg

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
मुक्रमाबाद प्रतिनिधी

शैक्षणिक वर्ष २०२२-२३  मध्ये घेण्यात आलेल्या १० वी एस.एस.सी. परीक्षेचा निकाल दिनांक ०२.०६.२०२३ रोजी जाहीर झाला.
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचे इयत्ता दहावीचा ९७.२० % निकाल लागला. या अनुषंगाने श्री छत्रपती संभाजी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मा.सरपंच प्रतिनिधी बालाजी अप्पा बोधने व शाळेचे संस्थापक श्री गजानन पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते सरस्वती प्रतीमेचे पुजन करुन यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल व फेटा पुष्पहार घालून यथोचित गौरव करण्यात आला.श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचे एकूण १४३ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. यामध्ये केंद्रातुन कु.सायली आशिष पंदिलवार 96.20 % गुण मिळवून केंद्रातुन सर्वप्रथम येण्याचे मान मिळविले ,कु.संजीवनी गोविंराव पाळेकर 93.80%  गुण मिळवून केंद्रामुळे द्वितीय क्रमांक तर तृतीय कु.आयशा अमीरसाब शेख 93.00 % गुण मिळविले. कु.जान्हवी संजयकुमार गुज्जलवार 92.00 % गुण कु.प्रतिक्षा राजेश दासरवार 92.20 % गुण मिळवुन उत्तीर्ण झाले असुन प्रशालेतील एकूण 84 विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीमध्ये तर 50 विद्यार्थी प्रथम गुणवत्ता श्रेणीमध्ये व 5 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.
या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक श्री गजानन पाटील गोजेगावकर मा.भाजपा जिल्हा अध्यक्ष मा. व्यंकटराव पाटील गोजेगावकर सामाजिक कार्यकर्ते सुभाष आप्पा बोधने, सेवा सोसायटी चेअरमन मा.श्री सुरेश सावकार पंदीलवार मुक्रमाबाद सरपंच प्रतिनिधी बालाजी अप्पा बोधने,ग्रा.प.सदस्य बालाजी अप्पा पसरगे,ग्रा.प.सदस्य हेंमत अप्पा खंकरे,शंकर अप्पा खंकरे, उपसरपंच सदाशिव बोयेवार,बंडेप्पा गंदिगुडे, नागनाथ थळपत्ते, अमजतखाॅ पठाण,सुरेश अप्पा पंचाक्षरे पत्रकार मष्णाजी बाजगीरे, बस्वराज वंटगिरे, विद्यार्थी पालक आशिष पंदिलवार,श्री व सौ.गोविंदराव पाळेकर,आमिरसाब शेख, तसेच विद्यालयाचे शिक्षक श्री मुख्याध्यापक बाहेगावे सर हावगीअप्पा खंकरे सर, ताहेर सर, संदिप खंकरे, यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील हजर होते.या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या शाळेतील शिक्षकांना विविध परीसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleकोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासिका कादंबरी बलकवडे यांची बदली
Next articleचार आमदारांच्या पत्राची वनमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; आर एफ ओ च्या बदल्यामध्ये शिरल्या अर्थकरण.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here