• Home
  • खासगी हॉस्पिटलमधील कोरोनाचे उपचार ऐकून हैराण व्हाल; वाचा पोलिसाचा अनुभव

खासगी हॉस्पिटलमधील कोरोनाचे उपचार ऐकून हैराण व्हाल; वाचा पोलिसाचा अनुभव

🛑 खासगी हॉस्पिटलमधील कोरोनाचे उपचार ऐकून हैराण व्हाल; वाचा पोलिसाचा अनुभव🛑
( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

वाशिंद :⭕मी पोलीस उप निरीक्षक विकास राऊत रा. वाशिंद, मी कोरोनो पॉझिटिव्ह असल्यामुळे वेदांत हॉस्पीटल ठाणे येथे उपचार घेत होतो. आता माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून मला डिस्चार्ज मिळाला आहे. मला कोरोना विषाणूने बाधित केल्याने त्याच्या सोबत कसे लढायचे हे शिकविले. तसेच कोरोनाने मला ध्यान-साधना (विपश्यना ) करायला आणि पुस्तके वाचायला पुष्कळ वेळ दिला. समाजातील स्वार्थी निस्वार्थी, ज्ञानी-अज्ञानी व्यक्तींची जाणीव करून दिली. एकांत वासातील जीवन जगण्यास शिकविले म्हणून कोरोना विषाणूचे ही मनःपूर्वक आभार मानतो.
माझ्यावर नामांकित खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना मला फक्त मल्टी व्हिट्यामिन गोळ्या, गरम पाणी, काढा, हळद मिश्रित दूध एवढेच उपचार दिले आणि त्यातच मी बरा झालो. मला आपणास एवढेच सांगणे आहे की, आपण सर्वांनी स्वतः पॉझिटीव्ह आहोत असे गृहीत धरून रोज गरम पाणी, काढा, हळद मिश्रित दूध पिण्याची सवय, अंडी आणि उत्तम आहाराचे सेवन करून योगसाधना आणि व्यायाम करावे. आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण लॉकडाऊन उठल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला कामानिमित्त घरा बाहेर पडायचे आहे. त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या पावसाळ्यात होणारे आजार हे मलेरिया, डेंग्यू की कोरोनो यापैकी कशामुळे होणार? याचे निदान समजने कठीण आहे. त्यामुळे जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव किमान एक वर्ष तरी संपणार नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने स्वतःची आणि काळजी घेणे अतंत्य गरजेचे आहे.
कोरोनोमुळे माणूस मरतो ही भीती सर्व प्रथम डोक्यातून काढून टाका. त्याच्या बरोबर जगायला आणि त्याला तोंड द्यायला शिका. (मी एक उदाहरण देऊ इच्छितो की कोरोनो येण्यापूर्वी आपल्या गावात किती लोक मयत पावले आणि कोरोना आल्या पासून किती लोक मयत झाले याचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे.) त्यामुळे मित्रांनो कोरोनोला न घाबरता सोशल डिस्टन्स पाळून आणि शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करा. स्वतःची योग्य ती काळजी घेत, कोरोनाविषयी असलेली भीती मनातून काढून टाका. न घाबरता त्यावर मात करा. मी माझ्या अनेक सहकाऱ्यांना, मित्रांना ज्यांना कोरोनाची काही लक्षणं होती अशांना मार्गदर्शन केले. तेव्हा ते घरगुती उपचार करून घरीच बरे झाले. रिपोर्ट निगेटिव्ह आले. सोबत माझे मोबाईल नंबर (9967330372) देत आहे.
मी आपणास सांगू इच्छितो की आपणास कोणाला कोरोनोची लक्षणे दिसून आली आणि तुमचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तरी आपण घरच्या घरीच उपचार करून सुद्धा बरे होऊ शकता. हा माझा आणि माझ्या अनेक कोरोनोबाधित मित्रांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आपणास काहीही अडचण असल्यास निसंकोचपणे कधीही कॉल करा. माझ्यापरीने जेवढी मदत करता येईल, तेवढी मदत करण्याचे मी प्रयत्न करेल. कोरोना विषाणूची लागण HIV सारखी नाही त्यामुळे त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला आणि सर्वप्रथम माणुसकी जपा…

anews Banner

Leave A Comment