• Home
  • गुजरातमध्ये दोन आमदारांचा राजीनामा

गुजरातमध्ये दोन आमदारांचा राजीनामा

🛑 गुजरातमध्ये दोन आमदारांचा राजीनामा 🛑
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

अहमदाबाद :⭕ गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला झटका बसला आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. करजन मतदारसंघाचे आमदार अक्षय पटेल यांनी राजीनामा दिला आहे, तर कपराडाचे आमदार जितू चौधरी सध्या पक्षाच्या संपर्कात नाहीत. त्यांनीही राजीनामा दिल्याचे पक्ष गृहीत धरत आहे. त्याचबरोबर आणखी एक आमदार राजीनामा देईल, असे बोलले जात आहे. येत्या 19 जून रोजी राज्यसभेच्या 24 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात गुजरातमधील चार जागांचा समावेश आहे. याआधी, मार्चमध्ये पाच काँग्रेस आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेसची विधानसभेतील सदस्य संख्या 68 वर आली. तर, भाजपचे 103 सदस्य आहेत.

anews Banner

Leave A Comment