• Home
  • टिक टँक” ला टक्कर देतोय भारताचे ” चिंगारी ” अँप.! ✍️दिल्ली ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

टिक टँक” ला टक्कर देतोय भारताचे ” चिंगारी ” अँप.! ✍️दिल्ली ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 “टिक टँक” ला टक्कर देतोय भारताचे ” चिंगारी ” अँप.! 🛑
✍️दिल्ली ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

दिल्ली :⭕करोना विषाणूचा फैलाव आणि त्यानंतर भारतासह जगभरातून सुरू सुरू होत असलेल्या ‘बॉयकॉट चायना’ चळवळीने आता वेग घेतला आहे. भारतात हि मोहीम जोरात चालू आहे. TikTok हे चीनी कंपनीचे अॅप असल्याने त्याला जोरदार विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर नव्याने आलेले मेड इन इंडिया अॅप ‘चिंगारी’ हे TikTokला टक्कर देत आहे. हे ‘चिंगारी’ अॅप आजवर २५ लाखांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे.

भारतात चीन सीमेवर झालेल्या तणावानंतर चायनीज अॅप्सचा वापर बंद करून भारतीय अॅप्सचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. युजर्स टिकटॉकला चिंगारी अॅपने रिप्लेस करीत आहे. त्यामुळे हे अॅप ट्रेंडिंग चार्ट्समध्ये पोहोचले आहे.
चिंगारी अॅपचे चिफ ऑफ प्रोडक्ट सुमीत घोष यांनी सांगितले की, या अॅपला डेव्हलप करण्यासाठी जवळपास २ वर्षाचा कालावधी लागला. या अॅपला खास करून भारतीय युजर्संच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहे. TikTok ची देसी चॉईस बनलेल्या या अॅपला छत्तीसगडच्या आयटी प्रोफेशनलसोबत एकत्र येवून ओडिशा आणि कर्नाटकच्या डेव्हलपर्सने तयार केले आहे.⭕

anews Banner

Leave A Comment