• Home
  • गृहमंत्र्यांच्या पुतण्याचा साधेपणा ! सातारकरांच्या नजरेत ✍️ सातारा (विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

गृहमंत्र्यांच्या पुतण्याचा साधेपणा ! सातारकरांच्या नजरेत ✍️ सातारा (विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 गृहमंत्र्यांच्या पुतण्याचा साधेपणा ! सातारकरांच्या नजरेत 🛑
✍️ सातारा (विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सातारा -⭕राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे आज सातारा जिल्हा दौर्‍यावर आले होते. गृहमंत्री म्हटल्यावर पोलीस बंदोबस्त अन् प्रशासनाचा थाटमाट आलाच. पण या सगळ्या गर्दीत एक गोष्ट सातारकर यांच्या नजरेत भरली ती म्हणजे गृहमंत्र्यांचा पुतण्या सत्यजीत देशमुख.

गृहमंत्र्यांचा पुतण्या म्हटल्यावर सुरक्षेच्या गराड्यात फिरत असणार,कुठंतरी एखाद्या भारदस्त खुर्चीवर बसलेला असणार ही धारणा प्रत्यक्षात सत्यजीत यांनी खोटी ठरवली. जिल्हाधिकारी कार्यालयात गृहमंत्री प्रशासनाकडून आढावा घेत असताना सत्यजीत मात्र, याच कार्यालयाच्या आवारात एका झाडाखाली निवांत बसून राहीले होते. त्यावेळी अनेकजण सत्यजीत बसलेल्या सिमेंटच्या बाकड्यावर बसून गेले.
पण जेव्हा कळाले की, सत्यजीत गृहमंत्र्याचे पुतणे आहेत तेव्हा अनेकांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली. त्यानंतर काही पोलीस दादा सत्यजीत यांच्याजवळ थांबले मात्र, त्यांनी तुमचे काम करा माझी काळजी नको असे नम्रपणे सांगतल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सत्यजीत यांचीच चर्चा सुरू होती…⭕

anews Banner

Leave A Comment