Home सामाजिक आदिवासींचा लोकनायक बिरसा मुंडा अद्यापही अपेक्षित, राज्यात विद्यमान २५ आमदार आदिवासी जमातीच्या...

आदिवासींचा लोकनायक बिरसा मुंडा अद्यापही अपेक्षित, राज्यात विद्यमान २५ आमदार आदिवासी जमातीच्या असुनही न्याय केव्हा मिळणार.

43
0

आशाताई बच्छाव

IMG_20231116_050505.jpg

आदिवासींचा लोकनायक बिरसा मुंडा अद्यापही अपेक्षित, राज्यात विद्यमान २५ आमदार आदिवासी जमातीच्या असुनही न्याय केव्हा मिळणार.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती (धामणगाव रेल्वे)
अवघ्या २५ वर्षाच्या आयुष्यात आदिवासींमध्ये क्रांतीची ज्योत पेटवून ब्रिटिश सरकार विरुद्ध लढा उभारणारे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या नावाने राज्यात एकही योजना नाही. आदिवासींच्या लोकनायकाला कधी न्याय मिळणार, असा प्रश्न त्यांच्या जयंतीच्या अनुषंगाने राज्यातील आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे नाव अग क्रमांक घेतल्या जाते. त्यांची जयंती संपूर्ण देशात आदिवासी बांधव साजरी करतात. बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड राज्यातील रांची जवळील लिहातू या आदिवासी गावात झाला. ब्रिटिशांच्या राजवटीत आदिवासींच्या वनसंपत्तीवर असलेल्या अधिकारावर बाधा येण्यासाठी सुरुवात झाली तेव्हा त्यांनी इंग्रजांविरुद्ध मोठा लढा उभारला होता. सन १८९४ मध्ये बिहार राज्यात भीषण दुष्काळ पडला.त्या दुष्काळात उपासमारी व महागाईने अनेक लोक मरण पावले. त्यावेळी त्यांनी गरीब आदिवासी समाजाची निस्वार्थ अंतकरणाने सेवा केली. ब्रिटिश सरकारने आकारलेल्या अवाजवी सारा माफ करून दुष्काळावर मात करण्याकरता त्यांनी आंदोलन उभे केले. त्यावेळी बिरसा मुंडा यांना दोन वर्षाचा करावास झाला होता. अनेक प्रसंगातून आदिवासी वरील जाच असाही झाल्याने सण १८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने पारंपरिक तीर-कामठा, भाले यांच्या साह्याने डोंगराळ भागातून ब्रिटिशांवर हल्ले चढले होते. त्याचा वाटपा काढण्यासाठी ब्रिटिश त्यांच्या मागे मध्ये बिरसा मुंडा डोमवाडी पाहाडावर आदिवासी जनतेला मार्गदर्शन करीत असताना ब्रिटिशांनी हल्ला चढविला. येथून ताब्यात घेतल्यानंतर रांची कारागृह त्यांची रवानगी करण्यात आली. तेथे अनन्वित त्यांचे निधन झाले. आदिवासींना न्याय मिळण्याकरता आदिवासी आमदार पुढाकार घेणार का? देशातील झारखंड, बिहार, ओडिषा, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश या राज्यातील आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपले दैवत मानले. झारखंड राज्यात बिरसा मुंडा कन्यारत्न योजना सुरू आहे. परंतु, महाराष्ट्रात एकही योजना या क्रांतिकार्याच्या नावाने सुरू करण्यात आली नाही राज्यात आज २५ आदिवासी आमदार आहेत. आणि पुढाकार घेतला, तर बिरसा मुंडा यांच्या नावाने योजना सुरू करण्यास सरकारला अवधी लागणार नाही. आता आदिवासी आमदार कधी पुढाकार घेणार, असा सवाल आदिवासींच्या संघटनेने केला आहे. धामणगावातील 2000 कार्यकर्ता बिरसा मुंडे जयंतीच्या कार्यक्रमात नागपूर येथे जाणार आहेत. आदिवासी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबरला नागपूर येथे कार्यक्रमाच्या आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील दोन हजार आदिवासी कार्यकर्ते नागपूरला जाणार आहेत. इतर राज्यात बिरसा मुंडा यांच्या नावाने अनेक योजना सुरू आहे परंतु, महाराष्ट्रात एकही योजना नाही. जयंतीच्या दिवशी शासकीय सुट्टी, शासकीय कार्यक्रम विविध योजना राबविण्यात आल्यास तेच बिरसा मुंडा यांना खरे अभिवादन ठरणार आहे. शासकीय कार्यक्रम, विविध योजना राबविल्यास तेच बिरसा मुंडा यांना खरे अभिवादन ठरणार आहे. असे माणिक तोडसाम जेष्ठ, आदिवासी समाज संघटना यांनी माहिती दिलेली आहे.

Previous articleसर्वज्ञ फॉउंडेशन रोटी बँक संस्थापक अध्यक्ष मनीष रमेशराव पावडे यांची महाराष्ट्र भूषण पुरस्कार साठी निवड
Next articleअमरावती विभागातील ६४ शाळा वर्ग खोल्याचा दीड कोटी तून  कायापालाट.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here