Home अमरावती सर्वज्ञ फॉउंडेशन रोटी बँक संस्थापक अध्यक्ष मनीष रमेशराव पावडे यांची महाराष्ट्र भूषण...

सर्वज्ञ फॉउंडेशन रोटी बँक संस्थापक अध्यक्ष मनीष रमेशराव पावडे यांची महाराष्ट्र भूषण पुरस्कार साठी निवड

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20231115-WA0104.jpg

सर्वज्ञ फॉउंडेशन रोटी बँक संस्थापक अध्यक्ष मनीष रमेशराव पावडे यांची महाराष्ट्र भूषण पुरस्कार साठी निवड
गजानन जिरापुरे
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
अमरावती- ‘युवाराज फुड्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ढगा, ता.वरूड जी. अमरावती व लोकजीवन बहुउद्देशीय संस्था व मिञ परीवार यांच्या विद्यमाने युवराज फुड्स च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त 19 नोव्हेंबर 2023ला वरूड येथे विविध श्रेञात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रत्नांचा सन्मान सोहळा होणार आहे . कार्यक्रमाचे उद्घाटक श्री डॉ. मनोहर आडे व सौ. सोनाली आडे . कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री नितिनजी खेरडे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय खासदार अनिलजी बोंडे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण, व सन्मानिय अतिथी म्हणून’ मिस इंडिया युनिव्हर्सल डॉक्टर रेशमी सांगली तीळफळे या उपस्थित राहणार आहे . या सर्व सन्माननीय पाव्हण्यांच्या उपस्थितीत सर्वज्ञ फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री मनिष रमेशराव पावडे यांना वरूड येथे यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात करण्यात येणार आहे . समाजसेवी स्वर्गीय रमेश पावडे यांच्या प्रेरणेने मनीष पावडे यांनी सर्वज्ञ फाउंडेशन रोटी बँक ची स्थापना 2018 सुरू करण्यात आली. आजही नियमित सुरू आहे.संस्थेमार्फत राबविण्यात येणारी मानविय सेवा. शहरात बेघर लोकांचा शोध घेणे. बेघर लोकांना नियमित अन्नदान करणे. ,मानविय दृष्टिकोनातून औषध उपचाराची सोय करणे, निराधार बांधवाना कपडे व चप्पल वाटप करणे. ,थंडीच्या दिवसांत ब्लँकेंटचे वाटप करणे. ,नेञहीन व अपंग लोकांचे विवाह सोहळ्याचे आयोजन करून त्यांना कौटुंबिक मदत देणे.,निराधार बेघर लोकांची स्वच्छता म्हणून दाढी कटिंग करणे. सर्वज्ञ फाउंडेशन कार्य सहा सात वर्षांपासून काम सुरू आहे. यामध्ये अनेक सेवाभावी मित्र मंडळ सहभाग घेते. दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सर्वज्ञ फाउंडेशन ला अमरावती जिल्ह्यांमधून एकमेव नाव महाराष्ट्र भूषण पुरस्कार साठी निवड झाली आहे. सर्व मित्रमंडळी, सेवाधारी आनंद व्यक्त करत आहे.

Previous articleचकपिरंजी येथे अनुसूचित जाती आघाडीची भाजपा शाखा कार्यकारणी गठीत
Next articleआदिवासींचा लोकनायक बिरसा मुंडा अद्यापही अपेक्षित, राज्यात विद्यमान २५ आमदार आदिवासी जमातीच्या असुनही न्याय केव्हा मिळणार.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here