Home अमरावती अमरावती विभागातील ६४ शाळा वर्ग खोल्याचा दीड कोटी तून  कायापालाट.

अमरावती विभागातील ६४ शाळा वर्ग खोल्याचा दीड कोटी तून  कायापालाट.

41
0

आशाताई बच्छाव

IMG_20231116_051005.jpg

अमरावती विभागातील ६४ शाळा वर्ग खोल्याचा दीड कोटी तून  कायापालाट.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
राज्यात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत १० जिल्ह्यातील ११४ वर्ग खोल्यांच्या बांधकामसाठी ३.१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये अमरावती विभागातील ६४ वर्ग खोल्या करिता सुमारे १ कोटी ६२ लाख ५० हजारांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसातच शाळा खोली बांधकामाला सुरुवात होणार असून यामुळे विद्यार्थ्यांच्या गैरसोळीचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्यात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत १० जिल्ह्यातील ११४ वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी ३.१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये अमरावती विभागातील अकोला, वाशिम, आणि अमरावती अशा तीन जिल्ह्यातील ६५ वर्ग खोल्यांचा काय पण होणार आहे. याकरता १ कोटी ६२ लाख ५० हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. पुढील काही दिवसातच शाळा खोली बांधकामाला सुरुवात होणार असून यामुळे विद्यार्थ्यांच्या बैठकीची व्यवस्था अडचण दूर होणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळा मधून अपुऱ्या वर्ग खोल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांचा बसण्याच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नवीन वर्ग खोल्या बांधकामाची मागणी केली जात होती. त्यासाठी जिल्ह्यांना नवीन बांधकामाचा प्रस्ताव वर्ग खोल्या देखील समग्रह शिक्षा अभियान कडे सादर केले होते. त्यानंतर अभियान कार्यालयाने प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत शाळा खोल्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. यामध्ये १० जिल्ह्यात ११४ वर्ग खोल्या बांधल्या जाणार असून त्यासाठी ३.१६ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यात २७ खोण्यासाठी४६.५० लाख रुपये अमरावती २६ खोल्यासाठी८३ लाख रुपये, तर वाशिम जिल्ह्यात ११ वर्ग खोली बांधकामासाठी ३३ लाख रुपयाची निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील काही जिल्ह्यात शाळा वर्ग खोल्या साठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here