Home मुंबई “माझ्यासारख्या व्यक्तीवर ही वेळ आणण्यात येते तर भाजपामधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काय होणार?...

“माझ्यासारख्या व्यक्तीवर ही वेळ आणण्यात येते तर भाजपामधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काय होणार? एकनाथ खडसेंचा संतप्त सवाल!”

86
0

राजेंद्र पाटील राऊत

“माझ्यासारख्या व्यक्तीवर ही वेळ आणण्यात येते तर भाजपामधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काय होणार? एकनाथ खडसेंचा संतप्त सवाल!”

ठाणे (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा न्यूज चॅनल)

आज एकनाथ खडसे यांनी जाहीरपणे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना शिंगावर घेतले आहे, भाजपचे कोण कोण गद्दार राष्ट्रवादीत आहेत….. अशा शेलक्या शब्दात टीका केले आहे. एका व्यक्तीच्या कट कारस्थानातून माझ्यावर आरोप झाले. मी बी एच आर पतसंस्थेचे गैरव्यवहार बाहेर काढले म्हणून माझ्या मागे ईडी लावण्यात आली,” असा आरोप करत एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे गिरीज महाजन यांच्यावर निशाणा साधला. “माझ्याकडे मी इन्कम टॅक्स भरतो याव्यतिरिक्त जर इतर बेहिशोबी मालमत्ता असेल तर मी ती जाहीरपणे यांना दान करीन. काहीही करा आणि एकनाथ खडसे यांना जेलमध्ये टाका असं कारस्थान सुरू आहे. परंतु मी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही,” असं एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.
ईडीने अटक केली, मालमत्ता जप्त झाली अशी अफवा पसरवत आहेत. पण मी कोणताही गुन्हा केलेला नाही, सर्व व्यवहार कायदेशीर आहेत. गेल्या ४० वर्षांपासून तुम्ही सर्व मला ओळखत आहात. ४० वर्षात मी कोणताही भ्रष्टाचार केला नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. दरम्यान भाजपामध्ये कोण कोण गद्दार आहेत हे राष्ट्रवादीत आल्यावर मला समजलं असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

Previous articleबॅंकेतून काढलेली रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून सलूनमध्ये दाढी करण्यास जाणे एका युवकाला चांगलेच महागात पडले 🛑
Next articleशहीद जवान निलेश धांडे यांचे पार्थिवावर वरुर जऊळका येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here