Home बुलढाणा बंद पडलेली पोकरा योजना पुर्ववत चालु करा! कृषी आयुक्तालयाकडे प्रशांत डिक्कर यांची...

बंद पडलेली पोकरा योजना पुर्ववत चालु करा! कृषी आयुक्तालयाकडे प्रशांत डिक्कर यांची मागणी

174

आशाताई बच्छाव

IMG-20230606-WA0051.jpg

बंद पडलेली पोकरा योजना पुर्ववत चालु करा!
कृषी आयुक्तालयाकडे प्रशांत डिक्कर यांची मागणी.

विशेष प्रतिनिधी
ज्ञानेश्वर पाटील दांदळे
संग्रामपूर/ विदर्भ व मराठवाड्यातील एकुण १५ जिल्ह्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी बंद असलेली पोकरा योजना तत्काळ सुरू करा या मागणीसाठी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी कृषी आयुक्तालय पुणे यांचेकडे लेखी निवेदनातून मागणी केली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा, हा प्रकल्प सन १८/१९ पासून २०२३ मार्चपर्यंत सुरळीतपणे सुरू होता, परंतु गेल्या एप्रिल महिन्यापासून या प्रकल्पात नवीन अर्ज घेणे बंद आहे, तसेस desk 1 – desk 2 – desk 3 वरील सर्व प्रकरणे प्रलंबित आहेत, वास्तविक पाहता आता खरीप हंगाम सुरू झाला आहे, सोयाबीन कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे आधीच मोडले गेले असतांनाच त्यात या प्रकल्पातून ठिबक व तुषार सिंचनाची सुद्धा पूर्वसंमती बंद असल्याने शेतकरी पुर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे, त्यामुळे सर्व शेतकरी योजने संदर्भात तालुका कार्यालयात चकरा घालून हैराण आहेत. खरिपाच्या तोंडावर पूर्वसंमती बंद करून शेतकऱ्यांची कोंडी करू नये. शेतकरी हीत लक्षात घेऊन पुर्ववत योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी निवेदणातुन केली आहे.

Previous articleपीक कर्जासाठी तातडीने अर्ज करा : शेतकरी कामगार पक्षाचे शेतकऱ्यांना आवाहन
Next articleकिसान सभेच्या वतीने पातुर्डा फाटा येथे निदर्शने!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.