Home गडचिरोली पीक कर्जासाठी तातडीने अर्ज करा : शेतकरी कामगार पक्षाचे शेतकऱ्यांना आवाहन

पीक कर्जासाठी तातडीने अर्ज करा : शेतकरी कामगार पक्षाचे शेतकऱ्यांना आवाहन

115
0

आशाताई बच्छाव

IMG-20230605-WA0025.jpg

पीक कर्जासाठी तातडीने अर्ज करा : शेतकरी कामगार पक्षाचे शेतकऱ्यांना आवाहन

गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ) : येणाऱ्या खरीप हंगामासाठी आवश्यक खर्चाच्या रक्कमेसाठी जिल्ह्यातील धान, कापूस,मका उत्पादक शेतकऱ्यांनी जवळच्या संबंधित बॅंक शाखांमध्ये पीक कर्जासाठी तातडीने अर्ज करुन आवश्यक रक्कम रोवणीपुर्वीच प्राप्त करावी, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा शाखेने शेतकऱ्यांना केले आहे.

शेतकरी कामगार पक्षातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील धान, कापूस, सोयाबीन, मका उत्पादक शेतकऱ्यांना शेतीची मशागत आणि पेरणी करीता आर्थिक मदतीची गरज असते. सध्या पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामात शेतकरी गुंतले आहेत. त्यामुळे आवश्यक पीक कर्जासाठी अर्ज करण्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. जुलै, ऑगस्ट मध्ये शेतकऱ्यांना जेव्हा रोवणीसाठी पैशांची गरज असते तेव्हा बॅंकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होवून प्रचंड त्रास सहन करावा लागतो. सरकारच्या जनहिताच्या धोरणानंतरही असे होवू नये अशी अपेक्षा असते. मात्र वेळेवर पीक कर्जाची रक्कम न मिळाल्याने रोवणीच्या कामात अडथळे निर्माण होवून शेतकरी नागवला जातो. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी जून महिन्यातच पीक कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी तातडीने अर्ज करुन धान रोवणीपुर्वीच पीक कर्जाची रक्कम प्राप्त करून तजवीज करावी.

तसेच पीक कर्जाची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंक अधिकाऱ्यांची तक्रार शेतकरी कामगार पक्षाकडे करावी, असेही आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, तुकाराम गेडाम, अशोक किरंगे, दामोदर रोहनकर, सुधाकर आभारे, रमेश चौखुंडे, डाॅ.गुरुदास सेमस्कर, चंद्रकांत भोयर, गंगाधर बोमनवार, प्रदिप आभारे, बाजीराव आत्राम, तुळशीदास भैसारे, देवेंद्र भोयर यांनी केले आहे.

Previous articleपीक कर्जासाठी तातडीने अर्ज करा : शेतकरी कामगार पक्षाचे शेतकऱ्यांना आवाहन
Next articleबंद पडलेली पोकरा योजना पुर्ववत चालु करा! कृषी आयुक्तालयाकडे प्रशांत डिक्कर यांची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here