आशाताई बच्छाव
किसान सभेच्या वतीने पातुर्डा फाटा येथे निदर्शने!
विशेष प्रतिनिधी
ज्ञानेश्वर पाटील दांदळे
संग्रामपूर – दिनांक २६ ते २८ एप्रील अकोले ते लोणी शेतकऱ्याच्या पायी मोर्चा ला त्यांच्या मागण्याबाबत राज्य सरकारने मोर्चाला लेखी आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची राज्य सरकारने त्वरीत अंमलबजावणी करावी. या व ईतर मागण्या पुर्ण करा यासाठी किसान सभेच्या वतीने पातुर्डा फाटा येथे आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पिक विमा तातडीने शेतकऱ्यांचा खात्यात जमा करावा अतीवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदत दयावी. वन जमिन कसणाऱ्या शेतकऱ्याच्या नावे करावी सर्वाना रेशन मधुन धान्याचा पुरवठा करावा. बियाणे व रासायनिक खतावरची सबसिडी वाढवून खते व बियाणेची किमती कमी करा, महीला कुस्तीगरांचे लैंगिक शोषणाचे आरोप असणाऱ्या बृजभुषन सिंह वर कठोर कारवाई करा .या मागण्यासाठी किसान सभेच्या राज्यव्यापी आंदोलनानुसार किसान सभेच्या वतीने दि ५ जुन रोजी पातुर्डा फाटा येथे प्रचंड घोषणा देत निदर्शने आंदोलन करन्यात आले आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ अनिल गायकवाड तालुका सचिव कॉ शेख अकबर यांनी केले. सागर पहुसकर ओम मुंडाले ,संतोष पाटील, शे जावेद, मुंकंद फेरण, शे मेहबुब, विश्वास तिवाणे आदी उपस्थीत होते.






