Home नांदेड जय अंबिका सहकारी संस्थेला मत्स्यव्यवसासाठी परवानगी द्यावी – भाजपा नेते गजानन जोशी

जय अंबिका सहकारी संस्थेला मत्स्यव्यवसासाठी परवानगी द्यावी – भाजपा नेते गजानन जोशी

102
0

आशाताई बच्छाव

IMG-20230606-WA0052.jpg

जय अंबिका सहकारी संस्थेला मत्स्यव्यवसासाठी परवानगी द्यावी – भाजपा नेते गजानन जोशी
अंबादास पाटिल पवार
लोहा, प्रतिनिधि
लोहा तालुक्यातील जय अंबिका मागासवर्गीय मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था म.लोहा या संस्थेवर मागील काही दिवसांपूर्वी मासेमारी करण्यासाठी प्रतिबंध घातला गेला होता,या संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेले अपील मत्स्यव्यवस्थापन मंत्रालयाने फेटाळले होते. आणि या सहकारी संस्थेच्या निवडणूकस कोविड कालावधीमुळे विलंब झाला होता,त्यामुळे ती लवकरात लवकर निवडणूक घेतली जावी असा आग्रह संस्थेतील काही मंडळींचा असल्याने सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी १९८५ पासूनचे २७ सभासद वगळून अचानकपणे निवडणूकीची घोषणा केली,प्रारूप यादी जाहीर करून निवडणूक घेतली परन्तु शेवटी सत्याचा विजय होतो हे नक्कीच! दि.०५ जून २०२३ रोजी निवडणूक घेतली गेली त्यारोजी आलेल्या निकालावरून “धनशक्तीच्या जोरावर जनशक्तीचा विजय” झाला आहे…

तसेच या मत्स्यव्यवसाय करणाऱ्या सहकारी संस्थेची काळ्या यादीतून मुक्तता करण्यात यावी,व जय अंबिका मागासवर्गीय मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था म.लोहा या संस्थेच्या सन २०२३ निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या सर्व विषयांची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावे,यासाठी भाजपा नेते तथा सहकार प्रकोष्ठ अध्यक्ष आ.प्रविण दरेकर साहेब यांना निवेदन देत सविस्तर माहिती देऊन अधिकाऱ्यांना आदेश/सूचना देण्यासाठी विनंती केली. यावेळी भाजपा प्रदेश सदस्य गजानन जोशी,भाजप पंचायतराज विभाग सह संयोजक ज्ञानेश्वर प्रेमलवाड,माधव पांचाळ आदी. उपस्थित होते…

— चौकशी —-

जय अंबिका मागासवर्गीय मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था म.लोहा,सन २०२३ साली झालेल्या निवडणूक कालावधीची पूर्णपणे चौकशीही होईल – मत्स्यव्यवसाय परवानगी मिळवून देण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्रालयाशी बोलून या विषयात मदत करेल…

आ.प्रविण दरेकर
प्रदेशाध्यक्ष सहकार प्रकोष्ठ – भाजपा,महाराष्ट्र

Previous articleकिसान सभेच्या वतीने पातुर्डा फाटा येथे निदर्शने!
Next articleदबंग पोलीस अधिकारी विलास पाटील यांची शेगावात एंट्री
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here