Home सोलापूर वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून राणा प्रताप ग्रुप संचलित वाचन कट्टा यांच्या...

वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून राणा प्रताप ग्रुप संचलित वाचन कट्टा यांच्या मार्फत व्याख्यानाचे आयोजन.

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20221019-WA0029.jpg

वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून राणा प्रताप ग्रुप संचलित वाचन कट्टा यांच्या मार्फत व्याख्यानाचे आयोजन.

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

गेले नऊ महिने नऊ पुस्तकांवरती आपण सर्वजण वाचन कट्ट्याच्या माध्यमातून पुस्तके ऐकण्याचा उपक्रम राबवत आहोत आता हा प्रतिसाद पाहता वाचन कट्टा पुढील महिन्यापासून विस्तारित आहे नवीन सदस्य उपक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छित आहेत नक्कीच समाजाला दिशा देणारा हा उपक्रम ठरत आहे व सर्वच क्षेत्रामधून हा उपक्रमाचे कौतुक होत आहे काल मोजे चिंचणी या ठिकाणी वाचन उपक्रमाच्या निमित्ताने चिंचणी वाचनालयाला राणा प्रताप ग्रुप तर्फे पुस्तक देऊन भेट व्याख्यान आयोजित करून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ज्ञानेश्वर मोरे सचिन कदम प्रशांत पाटील मंदार केसरकर देविदास जगताप कृष्णा शूर सेटवर आनंद नगरकर महेश भोसले प्रताप चव्हाण हे उपस्थित होते सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद सचिन कदम यांनी अतिशय उत्कृष्ट एक तासाची व्याख्यान दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद करण्यात आले होते व्याख्याते श्री सचिन कदम यांनी अदयस्थ या डाॅ. नीतू मांडके यांच्या जीवन चरित्राचे विश्लेषण केले लेखिका श्रीमती मांडके यांच्या अनुभवातून साकारलेले पुस्तक सचिन कदम यांनी तंतोतंत प्रेक्षकांसमोर मांडले.
श्रोत्यांसमोर मांडले नीतू मांडके यांना आलेले चांगले आणि वाईट अनुभव त्यातून घडलेला हा एक सच्चा डॉक्टर यांचा संघर्ष व जीवनातील तडजोड या पुस्तकातील घटना सचिन कदम यांनी सर्व श्रोत्यांसमोर श्रवणीय पद्धतीने मांडल्या नक्कीच सचिन कदम यांचे हे विश्लेषण ऐकून हे पुस्तक वाचावे असे मनोमन पक्के केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here