Home सोलापूर वाखरी ते पंढरपूर प्रस्तावित रस्त्याचे सुविधा स्थानातरासाठी 15 कोटी मंजूर करण्याचे मुख्यमंत्री...

वाखरी ते पंढरपूर प्रस्तावित रस्त्याचे सुविधा स्थानातरासाठी 15 कोटी मंजूर करण्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांचे आश्वासन- मा.आ. प्रशांत परिचारक.

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20221019-WA0031.jpg

वाखरी ते पंढरपूर प्रस्तावित रस्त्याचे सुविधा स्थानातरासाठी 15 कोटी मंजूर करण्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांचे आश्वासन- मा.आ. प्रशांत परिचारक.

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

पंढरपूर- वाखरी बायपास ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा ८.०० कि.मी रस्ता राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत सिमेंटकाँक्रीट करण्यासाठी १५० कोटी मंजूर झाले असून या रस्त्यामधील गटारी, पाईपलाईन व वीज वितरण स्थानांतराणासाठी 15 कोटी रुपये निधी देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचेमाडेत वाखरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा प्रस्तावित रस्त्याचे काम मंजूर झालेले आहे. यामध्ये पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती ते भोसले चौक येथे ओव्हर ब्रिज( उड्डानफुलसह ) मंजुरी देण्यात आलेली आहे. दरम्यान सदर काम करताना या रस्त्यावरील भुयारी गटारी, पाणीपुरवठा व विद्युत व्यवस्था यांचे स्थानांतर करण्याचे काम पंढरपूर नगरपरिषद ने करण्याचे आले आहे. या कामासाठी १५ कोटि रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्यामुळे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना पत्र देऊन मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री साहेब यांनी पत्राची दखल घेत पंढरपूर नगरपरिषदचा प्रस्ताव दाखल करावा त्यानंतर लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती मा. आ. प्रशांत परिचारक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here